Period changes with age: २०, ३० आणि ४० नंतर मासिक पाळीच्या फ्लो होतो बदल, डॉक्टरांनी सांगितली प्रत्येक वयोगटातील महत्त्वाची कारणं

Menstrual flow: वाढत्या वयानुसार मासिक पाळीच्या प्रवाहात बदल होऊ शकतात का? किशोरवय, प्रजननकाल आणि पेरिमेनोपॉजदरम्यान होणारे हार्मोनल बदल पाळीवर कसा परिणाम करतात, याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
Period changes with age
Period changes with agesaam tv
Published On

अनेक महिलांना असं वाटतं की, वाढत्या वयानुसार त्यांच्या मासिक पाळीच्या प्रवाहात बदल होतो. तर काही महिलांना हे दावे योग्य वाटत नाहीत. त्यामुळे मासिक पाळीचा प्रवाह खरोखरच वयानुसार बदलतो हा प्रश्न अनेक महिलांच्या मनात असतो. ओनली माय हेल्थ वेबसाईटला माहिती देताना'डॉ. मुम्माज ब्लेसिंग आयव्हीएफ अँड बर्थिंग पॅराडाईज'च्या वैद्यकीय संचालक, स्त्रीरोगतज्ञ आणि आयव्हीएफ तज्ञ यांच्याकडून डॉ. शोभा गुप्ता काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

वाढत्या वयानुसार बदलतो पाळीचा प्रवाह?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मासिक पाळीचा प्रवाह कधीही सारखा नसतो. तणाव, हार्मोनल बदल आणि झोपेचा अभाव या सर्वांमुळे या प्रवाहात बदल होऊ शकतो. डॉ. शोभा म्हणतात, वयानुसार, महिलांच्या मासिक पाळीच्या प्रवाहात बदल होतो. खरं तर, हार्मोनल बदल, जीवनशैलीतील घटक आणि गर्भधारणा यांमुळे महिलांच्या मासिक पाळीच्या प्रवाहात नैसर्गिकरित्या बदल होतो. सर्वसाधारणपणे, पौगंडावस्थेत मासिक पाळी अनियमित असते आणि रक्तस्राव जास्त असू शकतो. साधारण २०-३० वर्षांच्या वयात प्रवाह स्थिर होतो.

Period changes with age
Health warning signs: किडनी आणि लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात दिसतात हे बदल; डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती

कोणत्या वयात मासिक पाळीचा प्रवाह कसा असतो?

वयाच्या २० वर्षांअगोदर

२० वर्षांच्या पूर्वी आधी मुली पौगंडावस्थेत असतात. याच वयात मुलीला पहिली मासिक पाळी सुरू होते त्यामुळे सुरुवातीची काही वर्ष रक्तस्राव खूप अनियमित असू शकतो. या वयात शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सची पातळी स्थिर होत असते. त्यामुळे रक्तस्राव काही वेळा जास्त असतो तर काही वेळा फारच कमी असू शकतो.

२० ते ३० वयोगटातील महिला

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, २० ते ३० वयोगटात महिलांची मासिक पाळी नियमित होते. या वयात अनेक महिला लैंगिकदृष्ट्या एक्टिव्ह होतात आणि गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या घेतात. याचा परिणाम त्यांच्या मासिक पाळीवरही होतो. इतकंच नाही तर प्रसूतीनंतरही अनेक महिलांना पूर्वीपेक्षा जास्त किंवा अधिक वेळा मासिक पाळी येऊ शकते.

पेरिमेनोपॉज

वयाच्या ४० वर्षांनंतर, महिलांना पेरिमेनोपॉजचा अनुभव येतो. हा रजोनिवृत्तीच्या अगदी आधीचा टप्पा असतो. या काळात महिलांच्या अंडाशयातून होणाऱ्या हार्मोनच्या निर्मितीमध्ये चढ-उतार होतो. यामुळे मासिक पाळीचा प्रवाह अनियमित होतो. काही महिन्यांत रक्तस्राव खूप जास्त असू शकतो. इतकंच नाही तर काही महिलांना यावेळी फक्त ब्लड स्पॉट दिसून येऊ शकतात.

Period changes with age
How Painkillers Work: पेनकिलर घेतल्यानंतर लगेच कशा गायब होतात वेदना? वाचा औषधं पोटात गेल्यावर कसं काम करतं?

रक्तस्रावात बदल होणं सामान्य आहे का?

एकंदरीत वयानुसार, मासिक पाळीच्या रक्तस्रावात बदल होणं पूर्णपणे सामान्य आहे. विशेषतः पेरिमेनोपॉजच्या काळात स्त्रीच्या मासिक पाळीचं चक्र बदलू लागतं. ज्यामुळे तिच्या रक्तस्रावावर परिणाम होतो. याचं कारण वाढतं वय आणि हार्मोनल बदल असू शकतात. मात्र तरूण वयात जर मासिक पाळीचा प्रवाह कमी असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

Period changes with age
Menstrual cramps: पाळीदरम्यान घेतलेल्या पेन किलरमुळे प्रजननक्षमतेवर परिणाम होतो? डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com