मुंबईतील मालाड परिसरात भरदिवसा चौघांवर चाकूने हल्ला
हल्ल्यात आकाश धोत्रे (वय २८ वर्षे) या तरुणाचा जागीच मृत्यू
या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झालेत
या प्रकरणी २ जणांना पोलिसांनी अटक केली
मुंबईत हत्याकांडाची भयंकर घटना घडली. भरदिवसा एका तरुणाने चौघांवर चाकूने सपासप वार केले. मुंबईतल्या मालाड परिसरात ही घटना घडली. रस्त्यात गाठून तरुणाने चौघांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात चौघे गंभीर जखमी झाले. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मुंबईच्या कुरार पोलिस ठाणे हद्दीतील अप्पापाडा परिसरात ही धक्कादायक घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मालाडच्या अप्पापाडा परिसरात ही घटना घडली. एका व्यक्तीने भरदिवसा ४ जणांवर चाकूने हल्ला केला. या चाकू हल्ल्यात आकाश धोत्रे (वय 28 वर्षे) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या हल्ल्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. कुरार पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. या प्रकरणी कुरार पोलिसांनी दोन जणांना अटक केली. कुरार पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा देखील केला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कुरार पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिस सध्या आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासत आहेत. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर जखमी झालेल्या तरुणांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन तरुणांची पोलिस चौकशी करत आहेत. त्यांनी हा हल्ला का केला यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.