Assam Flood: आसाममध्ये पावसाचा हाहाकार, पूर- भूस्खलनाने घेतला ४१ जणांचा बळी

Assam Rainfall And Flood Update: आसाममध्ये मुसळधार पावसाने हाहाकार केला आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. आतापर्यंत ४१ जणांचा मृत्यू झाला.
Assam Flood: आसाममध्ये पावसाचा हाहाकार, पूर- भूस्खलनाने घेतला ४१ जणांचा बळी
Assam FloodSaam Tv
Published On
  • आसाममध्ये मुसळधार पावसामुळे पूर

  • पूर आणि भूस्खलनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे

  • या पावसामुळे आतापर्यंत ४१ जणांचा मृत्यू झाला

  • पावसामुळे ११ जिल्ह्यांतील लाखो नागरिक प्रभावित झालेत

देशभरात पावसाचा कहर सुरूच आहे. ढगफुटी, पूर आणि भूस्खलनामुळे अनेकांचा मृत्यू होत आहे. आसाममध्ये पावसाचा हाहाकार सुरू आहे. आसाममध्ये महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे जनजिवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. या पावसाने एकाच दिवसात १० जणांचा मृत्यू झाला आहे. आसाममध्ये आतापर्यंत पावसाने ४१ जणांचा बळी घेतला आहे. मृतांचा आकडा वाढत चालला आहे. आसामसाठी पुढील काही तास महत्वाचे असणार आहे. हवामान खात्याने अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला.

आसाममध्ये ढगफुटीसदृश्य परिस्थिती आहे. चराईदेव, शिवसागर, जोरहाट आणि गोलाघाट जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त पाऊस पडत असून मोठं नुकसान झाले आहे. आसाममधील पुराची परिस्थिती गंभीर आहे. आतापर्यंत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ११ जिल्ह्यांमधील ६५ लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. लष्कर, हवाई दल आणि इतर यंत्रणा मदत आणि बचाव कार्य करत आहे.

Assam Flood: आसाममध्ये पावसाचा हाहाकार, पूर- भूस्खलनाने घेतला ४१ जणांचा बळी
Raigad Flood: अंबा नदीच्या पुरात अडकलेल्यांची सुटका; 28 जणांचं थरारक रेस्क्यू, व्हिडिओ व्हायरल

आसामच्या दुर्गम भागात देखील पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. याठिकाणी अडकलेल्या लोकांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्यासाठी ड्रोनचाही वापर केला जात आहे. या ईशान्येकडील राज्यातील अनेक प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आज गोलाघाट जिल्ह्यातील सर्वाधिक प्रभावित भागांना भेट देणार आहेत. त्यांनी बुधवारी जोरहाट आणि शिवसागर येथील बचाव कार्याचा आढावा घेतला आणि पूरग्रस्तांशी संवाद साधला.

Assam Flood: आसाममध्ये पावसाचा हाहाकार, पूर- भूस्खलनाने घेतला ४१ जणांचा बळी
Cloudburst : गावे पाण्याखाली, हायवेवरील पूल वाहून गेला; अरुणाचल प्रदेशात ढगफुटीसदृश्य पावसाचा रुद्रावतार, VIDEO

दरम्यान, आसामच्या ११ जिल्ह्यांना पावसामुळे चांगलाच तडाखा बसला आहे. विनाशकारी पुरामुळे ३,६०,००० हून अधिक नागरिकांना फटका बसला. ब्रह्मपुत्रा, डिकोह, देसांग आणि धनसिरी यांसारख्या अनेक प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. हवामान खात्याने हा मुसळधार पाऊस लक्षात घेता नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन केले आहे.

Assam Flood: आसाममध्ये पावसाचा हाहाकार, पूर- भूस्खलनाने घेतला ४१ जणांचा बळी
Rain Flood : निसर्गाचं रौद्ररूप! मुसळधार पावसात जनजीवन विस्कळीत, ४४ नागरिकांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com