IED Blast: आसाम रायफल्सच्या वाहनामध्ये मोठा स्फोट; एक जवान शहीद, चार जण जखमी

Assam Rifles Convoy Targeted in Suspected IED Attack : नागालँडमधील सुखोवी जवळील आसाम रायफल्सच्या वाहनामध्ये मोठा स्फोट झालाय. हा IED हल्ला करण्यात आला असल्याचं सांगण्यात येत आहे. या स्फोटात एक जवान शहीद झालाय, तर ४ जवान जखमी झालेत.
Assam Rifles Convoy Targeted in Suspected IED Attack
Assam Rifles Convoy Targeted in Suspected IED Attack saam tv
Published On
Summary
  • आसाम रायफल्सच्या वाहनावर संशयित IED हल्ला झाला.

  • स्फोटात एक जवान शहीद झाला असून चार जवान जखमी

  • जखमी जवानांना तातडीने जवळच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नागालँडमधील सुखोवी परिसराजवळ आसाम रायफल्सच्या वाहनावर संशयित IED '(इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस') चा स्फोट झालाय. प्राथमिक माहितीनुसार या स्फोटात एक जवान शहीद झाला असून अन्य चार जण जखमी झालेत. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर वेढला असून शोधमोहीम सुरू आहे. जखमी जवानांना तातडीने जवळच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भ्याड हल्ल्यामागे कोणती दहशतवादी संघटना आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाहीये.

Assam Rifles Convoy Targeted in Suspected IED Attack
Pub Fire: मध्यरात्री पबमध्ये अग्नितांडव, भीषण आगीमध्ये होरपळून २७ जणांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

हा स्फोटाची ही घटना चुमौकेदिमा भागात घडली. आसाम रायफल्सच्या ताफ्याजवळ आयईडी (IED) स्फोट झाल्याची गेल्या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जातेय. घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षा दलांची तुकडी तैनात करण्यात आलीय. तर सुखोवी आणि आसपासच्या जंगलात हल्लेखोरांचा शोध घेतला जातोय. सुखोवी हे नागालँडच्या दीमापूर जिल्ह्यात असून ते एक केंद्रस्थान आहे.

Assam Rifles Convoy Targeted in Suspected IED Attack
Pakistan Airstrike : पाकिस्तानचा क्रूर चेहरा! अफगाणिस्तानवर बॉम्ब हल्ला, ११ मुलांसह १३ जणांचा मृत्यू

एका आठवड्यात घडलेली ही दुसरी घटना आहे. ६ जुलै रोजी मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यात संशयित दहशतवाद्यांनी एका ताफ्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात आसाम रायफल्सच्या ४० व्या बटालियनचे दोन जवान शहीद झाले. शहीद झालेल्या जवानांची ओळख वॉरंट ऑफिसर बलवंत सिंग आणि रायफलमॅन सी.एम. सिंग अशी पटली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com