Cloudburst : गावे पाण्याखाली, हायवेवरील पूल वाहून गेला; अरुणाचल प्रदेशात ढगफुटीसदृश्य पावसाचा रुद्रावतार, VIDEO

arunachal pradesh cloudburst like rain video : अरुणाचल प्रदेशातील सुबनसिरी आणि केयी पन्योर जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसानं कहर केला. अनेक गावं पाण्याखाली गेली. घरे आणि शेतीचं मोठं नुकसान झालं. मुख्य महामार्गावरील पूल वाहून गेला. या पावसाचा भयंकर व्हिडिओ व्हायरल होत आहे.
अरुणाचल प्रदेशातील ढगफुटीसदृश्य पावसाचा कहर, VIDEO
अरुणाचल प्रदेशात ढगफुटीसदृश्य पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली. अनेक घरांचे नुकसान झाले. तर हायवेवरील पूल वाहून गेला. saam tv
Published On

फक्त तीन तास पाऊस कोसळला अन् होत्याचं नव्हतं झालं. अरुणाचल प्रदेशात ढगफुटीसदृश्य पावसानं कहर केला. मुसळधार पावसामुळं भूस्खलन आणि अचानक पूरस्थिती निर्माण झाली. राज्यातील सुबनसिरी आणि केयी पन्योर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं अनेक गावं पाण्याखाली गेली. घरे आणि पिकांचं मोठं नुकसान झालं. मुख्य महामार्गावरील पूल वाहून गेल्याचीही माहिती समजते. हवामान खात्याच्या माहितीनुसार, अवघ्या तीन तासांत म्हणजेच सकाळी सहा ते नऊ वाजताच्या दरम्यान मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे नदीची पाणीपातळी वाढली आणि पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.

मुसळधार पावसानं लुक्सिन आणि तोरू सर्कलच्या अंतर्गत येणाऱ्या यियी १ आणि यियी २ या गावांमध्ये पूर आला होता. स्थानिकांच्या माहितीनुसार, सकाळी साडेसहानंतर पुराचं पाणी घरांमध्ये घुसू लागलं. तसंच आजूबाजूची शेती पाण्याखाली गेली होती. प्राथमिक माहितीनुसार, लुक्सिन गावातील काही घरे आणि अन्य इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. अननस, केळी आणि संत्र्यांच्या बागांसह इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचा अहवाल तयार करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

यियी गावाला पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका बसला. पुराचे पाणी रहिवासी वस्तीत घुसले होते. स्थानिक प्रशासनाने तातडीने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेले. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

पुराच्या पाण्याचा फटका अनेक गावांना बसला. मुसळधार पाऊस आणि नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने केयी पन्योर जिल्ह्यातील याजालीमध्ये एका कॉलनीत पाणी घुसलं. प्राथमिक माहितीनुसार, येथील १५ निवासी क्वार्टर्सचे नुकसान झाले. तर महामार्गावरील पूल वाहून गेला. यामुळे आसपासच्या परिसरातील गावांचा संपर्क तुटला.

अनेक दिवसांपासून पाऊस सुरू आहे. आज सकाळी ढगफुटीमुळं मुसळधार पाऊस कोसळला. कमी वेळेत जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, त्यावेळी पावसाचे पाणी डोंगराळ भागातून वाहून येतो आणि नदी, नाल्यांपर्यंत पोहोचतो आणि पूरस्थिती निर्माण होते. आगामी काही दिवसांत अरुणाचल प्रदेशच्या काही भागांत पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडू शकतात, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली.

अरुणाचल प्रदेशातील ढगफुटीसदृश्य पावसाचा कहर, VIDEO
Mumbai Rain : पहिल्याच पावसात मुंबईची 'तुंबई'; लोकल सेवा ठप्प, मुंबईसह उपनगरांना 'रेड अलर्ट'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com