Mumbai Rain : पहिल्याच पावसात मुंबईची 'तुंबई'; लोकल सेवा ठप्प, मुंबईसह उपनगरांना 'रेड अलर्ट'

Mumbai Palghar Red Alert : मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचले असून लोकल रेल्वे सेवा उशिराने सुरू आहेत. हवामान विभागाने मुंबईसह उपनगरांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
Mumbai Palghar Red Alert
Mumbai Palghar Red AlertSaam TV AI Image
Published On

Mumbai rain red alert latest update : मुंबईत मान्सूनचे जोरदार आगमन झाले असून पहिल्याच पावसात मुंबईची 'तुंबई' झाली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने मुंबई, रायगड, पालघर आणि मुंबई उपनगरासाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. पुढील काही तास अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पहिल्याच पावसामुळे मुंबईची लोकलही खोळंबली आहे.

मुंबईतील 'या' भागात साचले पाणी

पहिल्याच पावसामुळे मुंबईतील सखल भागांना पाण्याचा वेढा पडला आहे. चेंबूर, किंग्ज सर्कल, दादर, कुर्ला, अंधेरी सबवे, वरळी आणि लालबाग-परळ या सर्व प्रमुख ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहणार असल्याने नागरिकांनी अत्यंत आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Mumbai Palghar Red Alert
फ्लॅटधारकांसाठी मोठी बातमी! मेन्टेनन्सची कटकट संपणार; राज्य सरकारचा नवा ऐतिहासिक नियम तयार

रेल्वे सेवा विस्कळीत

पावसाचा मोठा फटका मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल प्रवासाला बसला आहे. ट्रान्स हार्बर लाईन पूर्पपणे ठप्प झाली आहे. तांत्रिक कारणामुळे आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे पनवेल ते ठाणे लोकल सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या मार्गावर ट्रॅकवर पाणी साचण्याचा हा पहिलाच अनुभव आहे. त्याशिवाय हार्बर लाईन १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहे. मध्य रेल्वे १५ मिनिटे तर पश्चिम रेल्वेची वाहतूक १० मिनिटे उशिराने सुरू आहे.

Mumbai Palghar Red Alert
PM Modi : मोठी बातमी! केंद्रीय मंत्र्याने दिला तडकाफडकी राजीनामा; मोदी मंत्रिमंडळात खळबळ

ठाणे आणि नवी मुंबईची स्थिती

ठाण्यात रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे डॉ. आंबेडकर रोड, श्रीरंग आणि वृंदावन परिसरात पाणी साचले आहे. शाळकरी मुलांना या पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे. वर्तक नगर भागात झाड पडल्याने ५ गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले असून गेल्या १० तासांत २५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

नवी मुंबई आणि उलवे परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. खारघर, नेरूळ, बेलापूर आणि उलवे परिसरात दमदार पाऊस झाला आहे. उरण ते जेएनपीटी महामार्गावर पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना पाण्यातून कसरत करत मार्ग काढावा लागत आहे.

Mumbai Palghar Red Alert
Smart Meter : अचानक वीज बिल दुप्पट-तिप्पट, स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना जोरदार 'शॉक', राज्यात संतापाचे वातावरण

वसई-विरारमध्ये रस्त्यावर 'स्विमिंग'; कल्याणकरांना दिलासा

जूनच्या शेवटच्या आठवड्यात आलेल्या या पावसाने नालासोपारा सेंट्रल पार्क, नागिंदास पाडा, टाकीपाडा रोड आणि विरारमधील ओल्ड व्हिवा कॉलेज परिसर जलमय झाला आहे. नालासोपाऱ्यातील मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्याने काही उत्साही तरुणांनी चक्क रस्त्यावरील पाण्यात पोहण्याचा (स्विमिंग) आनंद घेतला.

गेल्या काही दिवसांपासून कडक उकाड्याने त्रस्त असलेल्या कल्याण-डोंबिवलीकरांना मात्र या पावसाने मोठा दिलासा दिला आहे. रात्रभर पडलेल्या पावसाच्या सरींमुळे वातावरणात छान गारवा निर्माण झाला आहे.

Mumbai Palghar Red Alert
Pune Crime: इन्स्टावर रील आणि पिस्तुलांची डील; पुण्यातील कुप्रसिद्ध डीलर 'बबलू' लातूरमध्ये लॉक
Mumbai Palghar Red Alert
IAS transfer : राज्यात पुन्हा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा कुणाची कुठे झाली नियुक्ती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com