भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यानं पक्षाला ठोकला रामराम, तडकाफडकी दिला राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

Assam Politics : आसाममध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय. आसामी गायक सिमंत शेखर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी वैयक्तिक कारणांचा हवाला दिला असून भविष्यात आपण कोणत्याही अन्य राजकीय पक्षात सामील होणार नाही, असे स्पष्ट केलंय.
Assam Politics
Simanta Shekhar resigns from BJP in Assamsaam tv
Published On
Summary
  • आसामी गायक आणि भाजप नेते सिमंत शेखर यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला

  • राज्य चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे

  • भविष्यात कोणत्याही अन्य राजकीय पक्षात प्रवेश करणार नसल्याचे सिमंत शेखर यांनी स्पष्ट केले

आसामी गायक आणि भाजप नेते सिमंत शेखर यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्ष आणि 'आसाम राज्य चित्रपट वित्त व विकास महामंडळा'च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी वैयक्तिक कारणांचा हवाला देत पक्षाला रामराम ठोकलाय. भविष्यात कोणत्याही अन्य राजकीय पक्षात सामील होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या घडामोडीमुळे आसाम भाजपसाठी मोठा धक्का बसल्याचं मानलं जातंय.

सिमंत शेखर यांनी भाजपच्या आसाम राज्य कार्यकारिणी समितीचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. तरीही आसाम सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांचे नाव अद्यापही अध्यक्ष म्हणून दिसतंय. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, सिमंत शेखर यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष भाबेश कलिता यांच्याकडे आपला राजीनामा दिलाय.

Assam Politics
सरकारनं शेतकऱ्यांसाठी खूप केलंय, विजबीलही येत नाही; गिरीश महाजनांचा दावा

मुख्यमंत्री हिमंत सरमा यांना शुभेच्छा

गायक सिमंत शेखर यांनी वैयक्तिक कारणास्तव भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांना शुभेच्छाही दिल्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आसामचा विकास व प्रगती अशीच सुरू राहील, अशी आशाही व्यक्त केली.

सिमंत शेखर कोण आहेत?

सिमंत शेखर हे आसाममधील एक प्रसिद्ध गायक, संगीतकार आणि संगीत निर्माता आहेत. त्यांचा जन्म १८ मे १९८५ रोजी आसाममधील तिहू येथे झाला. शालेय जीवनापासूनच त्यांना गायक बनण्याची इच्छा होती. संगीतातील कारकीर्द सुरू करण्यापूर्वी त्यांनी दिब्रुगड विद्यापीठात 'फार्मास्युटिकल सायन्स'चे (औषधनिर्माण शास्त्राचे) शिक्षण घेतले होते, परंतु मनाचा आवाज ऐकून त्यांनी ते क्षेत्र सोडले.

Assam Politics
Anganwadi Sevika: अंगणवाडी सेविकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा; पर्यवेक्षिकेसाठी लागू असलेली वयाची अट रद्द

सिमंत शेखर यांचे पहिले गाणे 'तोरा दोई' (Tora Doi) प्रचंड लोकप्रिय ठरले. २०१३ मध्ये, त्यांनी 'कोक स्टुडिओ'वरील 'झुमर' (Jhumur) सादरीकरणात गायक पापोन यांच्यासोबत सहभाग घेतला होता. संगीत क्षेत्रातील यशानंतर, सिमंत शेखर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून सक्रिय राजकारणात पाऊल ठेवले. २०२२ मध्ये, मुख्यमंत्री हिमंत सरमा यांनी त्यांची 'आसाम राज्य चित्रपट वित्त आणि विकास महामंडळा'चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com