सरकारनं शेतकऱ्यांसाठी खूप केलंय, विजबीलही येत नाही; गिरीश महाजनांचा दावा

Girish Mahajan: शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी विशेष अधिवेशनाची गरज नसल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले. सरकार शेतकऱ्यांसाठी कॅबिनेटमध्ये निर्णय घेत असल्याचा त्यांचा दावा आहे.
Girish Mahajan:
Girish Mahajan statement on Maharashtra farmerssaamtv
Published On
Summary
  • गिरीश महाजन यांचे शेतकऱ्यांसाठी सरकारच्या निर्णयांवर वक्तव्य

  • शेतकऱ्यांसाठी अधिवेशनाची गरज नाही गिरीश महाजन यांचे स्पष्टीकरण

  • शेतकऱ्यांसाठी कॅबिनेटमध्ये निर्णय घेत असल्याचे गिरीश महाजन म्हणाले

शेतकऱ्यांसाठी निर्णय घेण्यासाठी अधिवेशन घेण्याची गरज नाहीये. अधिवेशन घेऊन काही मार्ग निघेल असा प्रश्न नाहीये. जो निर्णय आम्ही अधिवेशनात घेऊ तो निर्णय आम्ही कॅबिनेटमध्ये घेतोय, आम्ही कुठे कमी पडतोय. आमच्या सरकारनं शेतकऱ्यांसाठी जितकं केलं ते तिकतकं कोणीची केलं नाहीये. कोणत्या राज्यानेही असे निर्णय घेतले नसल्याचं मंत्री गिरीश महाजन म्हणालेत.

मंत्री गिरीश महाजन हे साम टीव्हीच्या ब्लॅक अँण्ड व्हाईट या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांना दुष्काळ परिस्थितीवरून प्रश्न करण्यात आला. कर्नाटक राज्यानं अधिवेशन घेत दुष्काळ जाहीर घोषणा केला. पण महाराष्ट्र सरकारला ते का करता येत नाही, अशा प्रश्न महाजन यांना करण्यात आला. त्याला उत्तर देताना महाजन म्हणाले, शेतकऱ्यांसाठी निर्णय घेण्यास आम्ही कमी पडत नाहीत. महाराष्ट्र शासनाने जितकं केलं तितकं कोणी केलं नाहीये. ना कुठल्या सरकारने केलं नाही. ना कोणत्या राज्याने केलंय.

Girish Mahajan:
मोठी बातमी! धार्मिक सण-उत्सवात फटाके फोडण्यास बंदी; उच्च न्यायालयाचा आदेश

आम्ही कर्जमाफी केली. शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी केली दोन लाखापर्यंतची त्यानंतर आपण सोलर पंप देण्यात आलेत. शेतकऱ्यांना आता वीज म्हणजे बिल भरावं लागत नाहीये. शेतकऱ्यांना सोलर पंप दिले आहेत. साडेसात पॉवर वाले पंप लाखो शेतकऱ्यांना दिलेत. त्यामुळे शेतकऱ्यांना विजबिल येत नाही. ज्यांची होती तेही आपण माफ केलंय. शेतकऱ्यांसाठी हे सगळे निर्णय आमच्या सरकारने याठिकाणी घेतलेत. त्यामुळे अधिवेशन घेतलं तर प्रश्न सुटतील असे नाहीये. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत अतिशय संवदेनशील असल्याचं गिरीश महाजन म्हणालेत.

पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना

राज्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झालीय. त्यापार्श्वभूमीवर सरकारनं कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे. नुकसान झालेल्या पिकांची तातडीने पंचनामे करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. मात्र विरोधकांकडून सरकारच्या निर्णय घेण्याच्या संथ गतीवरून टीका केली जातेय. अधिवेशन घेवून शेतकऱ्यांबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी विरोधकांकडून केली जातेय.

Girish Mahajan:
एक म्हैस घेण्यासाठी किती कर्ज मिळू शकते? जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि पात्रता

कॅबिनेटमध्ये दुष्काळावर चर्चा झाल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे यावर चर्चा करण्यात आली. दरम्यान, नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्याची माहिती एकनाथ शिंदेंनी दिली. मुख्यमंत्री देखील काही भागात स्वत: जाणार आहेत. मी देखील काही भागात पाहाणी दौरा करणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com