Asaduddin Owaisi : दहशतवादी कारवाया लपवण्यासाठी पाकिस्तानकडून इस्लामचा वापर, असदुद्दीन ओवैसी यांची जहरी टीका

Asaduddin Owaisi Video : पाकिस्तानला आयएमएफने पाकिस्तानला १ अब्ज डॉलर्सचे कर्ज मंजूर झाल्याने असदुद्दीन ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तान इस्लामच्या आड दहशतवादी कारवाया करत असल्याचे ओवेसी यांनी म्हटले आहे.
Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisi X
Published On

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध ताणले गेले आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे नष्ट केले. त्यानंतर पाकिस्तानने वारंवार भारतावर हल्ले करण्याचे प्रयत्न केले. हे हल्ले हाणून पाडण्यात भारताला नेहमीच यश आले आहे. युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. पाकिस्तान दहशतावादासाठी इस्लामचा वापर करत असल्याचे ओवेसी यांनी म्हटले आहे.

एएनआयशी बोलताना असदुद्दीन ओवेसी यांनी 'भारतात २३ कोटींपेक्षा जास्त मुसलमान राहतात हे पाकिस्तान सहज विसरतो. आमच्या पूर्वजांनी जिना यांचा द्विराष्ट्र सिद्धांत नाकारला होता. आम्ही भारताला आमचा देश म्हणून स्वीकारले आहे. आम्ही इथेच राहू. पाकिस्तानला धर्माच्या नावाखाली भारताचे विभाजन करायचे आहे. त्यांना हिंदू, मुस्लीम आणि इतर समुदायांमध्ये तणाव निर्माण करायचा आहे. पाकिस्तान त्यांच्या सर्व बेकायदेशीर कारवाया लपवण्यासाठी इस्लामचा मुखवटा म्हणून वापर करत आहेत', असे वक्तव्य केले आहे.

Asaduddin Owaisi
Viral Video : हीच खरी देशभक्ती! डीसींचे एक आवाहन अन् अनेक तरूणांनी धरली भरतीची वाट, म्हणाले- सैन्याला पाठिंबा देण्यासाठी...

'पुंछ हा सीमावर्ती भाग आहे. पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात पुंछमध्ये १६ जणांना आपला जीव गमवावा लागला. मृतकांमध्ये १० वर्षांपेक्षा कमी वयाची ४ लहान मुलं होती. गोळीबारात एका मशिदीच्या इमामाचा मृत्यू झाला. पाकिस्तान हेच करत आहे आणि हेच करत राहणार. पाकिस्तान आणि दहशतवादाविरुद्ध मला देशात एकता आणि एकमत दिसत आहे. देश एकसंध आहे. आपल्याला एकत्र येऊन पाकिस्तानी दहशतवाद्यांना संपवायचे आहे', असे ओवेसी म्हणाले.

Asaduddin Owaisi
Ind Pak Tension : महेंद्रसिंह धोनी देशासाठी सीमेवर लढाई करण्यासाठी जावे लागणार? कारण...

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ) पाकिस्तानला १ अब्ज डॉलर्सचे कर्ज मंजूर झाले आहे. यावर ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली. आयएमएफने पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांना कर्ज दिले आहे असे म्हणेन. भारतात दहशतवादी कारवाया करणारा आणि दहशतवाद्यांना निधी पुरवणारा पाकिस्तानच आहे हे माहीत असूनही अमेरिका, कॅनडा आणि जर्मनी यांनी मौन पाळले आहे, हे दुर्देवी आहे. या पैशांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होईल, असे वक्तव्य असदुद्दीन ओवेसी यांनी केले.

Asaduddin Owaisi
Fact Check : पाकिस्तानने भारताची S-400 सुदर्शन चक्र सुरक्षा प्रणाली नष्ट केली? व्हायरल मेसेजमागचं सत्य जाणून घ्या...

मागील काही दिवसांपासून असदुद्दीन ओवेसी चर्चेत आहेत. त्यांचा पाकिस्तान मुर्दाबाद... हिंदुस्तान जिंदाबाद अशा घोषणा देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ओवेसीसह देशातील सर्व विरोधी नेत्यांनी सत्ताधारी नेत्यांना पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे देशात एकजुट पाहायला मिळत आहे.

Asaduddin Owaisi
Operation Sindoor : ५ पाकड्यांना संपवलं, शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला; घाटकोपरचे मुरली नाईक शहीद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com