

पंजाबमध्ये १२ दिवसांत तिसऱ्या राजकीय नेत्याची हत्या
लग्न समारंभात नाचत असताना सरपंचावर गोळीबार
आप नेते हरपिंदर सिंग यांचा जागीच मृत्यू
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या आणखी एका नेत्याची हत्या झाली आहे. तरनतारन येथील आम आदमी पक्षाचे सरपंच हरपिंदर सिंग यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. ही घटना फतेहाबाद परिसरातील एका फार्महाऊसवर घडली. येथे लग्न समारंभ होता, त्याचवेळी गोळीबार झाल्याची घटना घडली. आप नेते हरपिंदर सिंग हे लग्नात सहभागी होण्यासाठी आले होते.
लग्नात डान्स चालू असताना चार जणांनी सरपंच हरपिंदर सिंग आणि त्यांच्या भावावर गोळीबार केला. यात सरपंचाचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा भाऊ गंभीररित्या जखमी झाला आहे. त्यांना अमृतसरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ठिट्टया महंता गावाचे सरपंच हरपिंद सिंग त्यांचे चुलत भाऊ जर्मनजीत सिंग यांच्यासोबत लग्नासाठी फार्महाऊसवर गेले होते. त्यावेळी हरपिंदर सिंग त्यांच्या मित्र आणि नातेवाईकांसोबत स्टेजवर नाचत होते. तेव्हा अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
हरपिंदर सिंग यांच्या पोटात आणि डोक्याला चार गोळ्या लागल्या, यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. जर्मनजित सिंग यांनी हल्लेखोरांचा पाठलाग केला तेव्हा त्यांनी त्यांच्यावरही गोळीबार केला. गोळीबार करणारे चारजण होते. या गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. पोलिसांनी मृतदेह पोस्ट मॉर्टमसाठी पाठवण्यात आलाय. फॉर्महाऊस वर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने हल्लेखोरांची ओळख पटवली जातेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.