Shocking: बंजी जम्पिंग करताना तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, मानेचं हाड तुटलं नंतर...; थरारक VIDEO व्हायरल

Bungee Jumping Accident Video: बंजी जम्पिंग करताना एका तरुणीचा मृत्यू झाला. उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये ही घटना घडली. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Shocking: बंजी जम्पिंग करताना तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, मानेचं हाड तुटलं नंतर...; थरारक VIDEO व्हायरल
Bungee Jumping Accident VideoSaam Tv
Published On

Summary -

  • ऋषिकेशमध्ये बंजी जम्पिंग करताना तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

  • घटनेचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

  • जोराच्या झटक्याने तरुणीच्या मानेचे हाड तुटले आणि तिचा मृत्यू झाला

उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये बंजी जम्पिंग करताना एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बंजी जम्पिंग करताना तरुणीचा हवेतच मृत्यू होताना हा थरारक व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसला. आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत ही तरुणी उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये फिरण्यासाठी गेली होती. याठिकाणी साहसी खेळ समजल्या जाणाऱ्या बंजी जम्पिंग करताना तिचा भयानक मृत्यू झाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसणारी तरुणी बंजी जम्पिंग करण्यासाठी तयार असल्याचे दिसत आहे. तिने सर्व सुरक्षा किट घातलेले आहे. सुरूवातीला ती बंजी जम्पिंग करण्यासाठी खूप उत्साही असल्याचे दिसत आहे. तिचे मित्र-मैत्रिणी देखील तिला चिअर्स करत असल्याचा आवाज या व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे. पण अवघ्या काही सेकंदात भयंकर घडतं. जसं ऑपरेटर बंजी जम्पिंग मशिनचं बटण दाबतो तसं तरुणी उंच हवेत उडते. अचानक ऐवढ्या उंचावर गेल्यामुळे तरुणी प्रचंड घाबरते. जोराचा झटका बसल्यामुळे या तरुणीच्या मानेवर ताण येतो आणि मानेचे हाड मोडते. दोन ते तीन वेळा ही तरुणी हवेतच गोल फिरते. त्यानंतर ती मान टाकते. या घटनेत तिचा मृत्यू होतो. तरुणी शांत झाल्याचे पाहून तिचे मित्र-मैत्रिणी घाबरतात आणि ते ऑपरेटरला तिला खाली घेण्यास सांगतात.

तरुणीच्या मित्र-मैत्रिणींनी हा बंजी जम्पिंगचा थरार आपल्या मोबाइलमध्ये कैद केला. आपल्या मैत्रिणीचा असा मृत्यू होईल असे त्यांना अजिबात वाटले नव्हते. क्षणात अनर्थ घडला आणि तरुणीच्या मृत्यूमुळे घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण होते. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी यावर संताप व्यक्त करत आहेत. त्यांनी बंजी जम्पिंगच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अनेक युजर्सने हे निष्काळजीपणाचे परिणाम असल्याचे म्हटले आहे.

Shocking: बंजी जम्पिंग करताना तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, मानेचं हाड तुटलं नंतर...; थरारक VIDEO व्हायरल
Shocking : १४ फेब्रुवारीची ती रात्र, आई वडील चक्क ४ वर्षाच्या बाळाला कॅबमध्ये विसरले अन्...

उत्तराखंडमध्ये अनेक पर्यटनस्थळं आहेत. या ठिकाणी दरवर्षी मोठ्यासंख्येने पर्यटक येत असतात. ऋषिकेश हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर साहसी खेळांसाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक बंजी जम्पिंग आणि रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेतात. हे साहसी खेळ करत असताना काहींचा मृत्यू होतो तर काही जखमी झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशामध्ये उत्तराखंडमध्ये हे साहसी खेळ करताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे

Shocking: बंजी जम्पिंग करताना तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, मानेचं हाड तुटलं नंतर...; थरारक VIDEO व्हायरल
Shocking : पुणे हादरलं! आई आणि भावासमोर मुलीचे अपहरण, डोळ्यात मिरची पावडर फेकली, अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com