Shocking : १४ फेब्रुवारीची ती रात्र, आई वडील चक्क ४ वर्षाच्या बाळाला कॅबमध्ये विसरले अन्...

Bengaluru News : बंगळुरूमध्ये व्हॅलेंटाईन डे दिवशी फिरायला गेलेल्या जोडप्याने आपल्या ४ वर्षांच्या मुलाला कॅबमध्ये विसरल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी तातडीने कारवाई करून मुलाला सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले.
Shocking : १४ फेब्रुवारीची ती रात्र, आई वडील चक्क ४ वर्षाच्या बाळाला कॅबमध्ये विसरले अन्...
Bengaluru NewsSaam Tv
Published On
Summary
  • बंगळुरूमध्ये आई वडील ४ वर्षांच्या मुलाला कॅबमध्ये विसरले

  • घटना व्हॅलेंटाईन डे दिवशी घडली

  • ११२ हेल्पलाइनवर कॉल केल्यानंतर पोलिसांची तत्पर कारवाई

  • पालकांच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित

अरे देवा! आई वडील चक्क पोटच्या ४ वर्षाच्या मुलाला कॅबमध्ये विसरले. ही कोणत्याही मालिकेतील कथा नसून बंगळुरूमध्ये १४ फेब्रुवारी रोजी घडलेली सत्य घटना आहे. याप्रकरणी पोलिसांनी २४ तासांच्या आत चिमुकल्याचा शोध घेऊन पालकांच्या हवाले केलं आहे. दरम्यान या घटनेनंतर पालकांच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे दिवशी बंगळुरूमधील एक जोडपं फिरण्यासाठी गेलं होत. त्यांच्यासोबत त्यांचा ४ वर्षाचा मुलगा देखील होता. फिरून झाल्यानंतर या जोडप्याने घरी जाण्यासाठी कॅब बुक केली होती. या कॅबमध्ये बसून ते घरी परतण्यासाठी निघाले. यादरम्यान त्यांचा ४ वर्षाचा मुलगा कॅबमध्ये झोपी गेला. हे दांपत्य एकमेकांशी गप्पा मारत बसले होते.

Shocking : १४ फेब्रुवारीची ती रात्र, आई वडील चक्क ४ वर्षाच्या बाळाला कॅबमध्ये विसरले अन्...
Ajit Pawar Accident Video : अजित पवारांच्या विमान अपघाताचा अंगावर काटा आणणारा नवीन व्हिडिओ समोर, पाहा Video

कॅब चालकाने जोडप्याला नियोजित ठिकाणापर्यंत म्हणजेच त्यांच्या घरापर्यंत सोडलं. मात्र या जोडप्याने आपला ४ वर्षाचा मुलगा टॅक्सीमध्ये झोपला आहे. याचा विसर पडला होता. घरी गेल्यावर काही तासांनंतर संबंधित जोडप्याला आपलं बाळ आपल्यासोबत नसल्याची आठवण झाली. लगबगीने त्यांनी ११२ आपत्कालीन हेल्पलाइनवर कॉल केला आणि घडलेली घटना पोलिसांना कळवली.

Shocking : १४ फेब्रुवारीची ती रात्र, आई वडील चक्क ४ वर्षाच्या बाळाला कॅबमध्ये विसरले अन्...
Akola : एका लग्नाची अजब गोष्ट! सोशल मीडियावर जुळल्या रेशीमगाठी, साडेतीन फूट नवरदेव आणि तीन फूट नवरीच्या लग्नाची सर्वत्र चर्चा

पोलिसांनी घटनेची गांभीर्यता लक्षात घेत तातडीने तपासाला सुरुवात केली. अवघ्या काही तासांच्या आता पोलिसांनी कॅब चालकाशी संपर्क केला. यावेळेस कॅबचालकाने बाळ सुखरूप असल्याचे म्हटले. तसेच कॅबचालकाने प्रामाणिकपणा दाखवत मुलाला पालकांच्या स्वाधीन केले. दरम्यान या घटनेने पालकांचं मुलांकडे दुर्लक्ष होत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com