मी गेल्यावर तुझं काय? या भीतीतून थरारक कृत्य; इस्रोच्या माजी कर्मचाऱ्याने पत्नीचा गळा दाबून घेतला जीव

Retired ISRO Employee Kills Wife In Bengaluru Apartment: बंगळुरूमध्ये इस्रोच्या निवृत्त कर्मचाऱ्याने ‘मी गेल्यावर तुझं काय होईल’ या भीतीतून पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Police investigation underway at the Bengaluru apartment where a retired ISRO employee allegedly strangled his wife
Police investigation underway at the Bengaluru apartment where a retired ISRO employee allegedly strangled his wifeSaam Tv
Published On

आपण गेल्यानंतर आपल्या बायकोचे काय होईल या टेंशनमुळे नवऱ्याने बायकोचा खून केल्याची खळबळ माजवणारी घटना घडली आहे. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) एका निवृत्त कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केली. ६५ वर्षीय नागेश्वर राव असे खुनीचे नाव आहे. नागेश्वर हा बेंगळुरूच्या बोम्मेहल्ली परिसरातील व्हर्चुओसो अपार्टमेंटमध्ये राहत होता. बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना मृत्यूची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागेश्वर राव मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता आणि आत्महत्येचा विचार करत होता. प्राथमिक माहितीनुसार, ६५ वर्षीय नागेश्वर राव यांनी त्यांची पत्नी संध्याश्री हिची टॉवेलने गळा दाबून हत्या केली. पोलिस तपासात असे दिसून आले आहे की राव यांना मानसिक आजार होता आणि ते आत्महत्या करण्याचा विचार करत होते. हे पाऊल उचलण्यापूर्वी त्यांनी पत्नीला मारण्याचा निर्णय घेतला होता.

Police investigation underway at the Bengaluru apartment where a retired ISRO employee allegedly strangled his wife
4 महिन्यांपूर्वी लग्न, व्हॅलेंटाईनडेच्या दिवशीच CA नवऱ्याने गरोदर बायकोचा कात्रीने गळा चिरला

दोघांमध्ये कुठलाही घरगुती वाद नाही;

या घृणास्पद कृत्यामागे कोणतेही मोठे घरगुती वाद किंवा कोणीच कारणीभूत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि अधिक माहिती मिळवत आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून इस्रोचे माजी कर्मचारी कर्मचारी नागेश्वर राव यांनी त्यांच्या पत्नीची हत्या का केली असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com