

पंजाबमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना टळली
ट्रेनचा कपलर तुटल्याने घडली घटना
मोठ्या आवाजाने प्रवासी घाबरले
पंजाबच्या लुधियाना रेल्वे स्टेशनवर शनिवारी मोठी दुर्घटना टळली. १२०० प्रवाशांना घेऊन जाणारी कटरा स्पेशल ट्रेनचा कपलर तुटल्याची घटना घडली आहे. कपलर तुटल्याने ट्रेन दोन भागात विभागली. यानंतर झालेल्या मोठ्या आवाजानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. तर ट्रेन थांबल्यानंतर काही जण ट्रॅकवर उतरले.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्ली-श्री माता वैष्णो देवी कटरा स्पेशल ट्रेन शनिवारी दीड वाजता नवी दिल्लीहून रवाना झाली. त्यानंतर सकाळी ८.४७ वाजता ट्रेन लुधियाना रेल्वे स्टेशनवर पोहोचली. ट्रेन स्टेशनला पोहोचल्यानंतर एका स्लीपर कोचमधून अचानक मोठा आवाज आला.
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या आवाजामुळे प्रवाशांना स्फोट झाल्याची भीती वाटली. परंतु काही वेळानंतर ट्रेन दोन भागात विभागली गेली. कपलर तुटल्याने झालेल्या आवाजामुळे ट्रेनमधील प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली. या घटनेनंतर प्रवासी डब्यातून बाहेर आले. प्रवाशांनी तातडीने रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती दिली. काही वेळासाठी रेल्वे स्टेशनवर गोंधळ उडाल्याचे दिसून आले. कपलर तुटताना ट्रेनचा वेग कमी होती. ही ट्रेन स्टेशनवरून काही मिनिटाआधी निघाली होती.
तत्पूर्वी, एक्स्प्रेस वेगात असती तर मोठी दुर्घटना घडली असती. त्यामुळे दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली असती. या घटनेनंतर रेल्वे प्रशासन अलर्ट झालं आहे. सूचना मिळताच रेल्वे अधिकारी आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.
पोलीस अधिकारी समीर वर्मा यांनी घटनास्थळी पोहोचून ट्रेनची पाहणी केली. प्राथमिक तपासात स्फोट आणि संशयास्पद हालचालीचे संकेत आढळून आले नाहीत. ट्रेन स्टेशनवरून निघताना दोन डब्यांना जोडणारा कपलर तुटला. त्यामुळे एक डबा दुसर्या डब्यापासून वेगळा झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.