सोशल मीडियावर 11 लाख फॉलोअर्स; पण मतं फक्त 444! प्रसिद्ध इन्फ्लएन्सरचा दारुण पराभव

Social Media Fame Fails to Convert Into Votes: सोशल मीडियावर 11 लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या हिम्मताराम खदाव यांना राजस्थानच्या सरपंच निवडणुकीत फक्त 444 मते मिळाली.
11 LAKH FOLLOWERS BUT ONLY 444 VOTES
11 LAKH FOLLOWERS BUT ONLY 444 VOTESsaam tv
Published On: 

सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असले म्हणजे निवडणुकीत विजय मिळतोच असे नाही. हे राजस्थानमधील पंचायत निवडणुकीच्या निकालातून समोर आले आहे. सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या आणखी एका इन्फ्लएन्सरला सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. जोधपुर जिल्ह्यातील बावडी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या लवेरा कला ग्रामपंचायतीत हा प्रकार घडला.

11 LAKH FOLLOWERS BUT ONLY 444 VOTES
देशावर पुन्हा चक्रीवादळाचं संकट! अनेक राज्यांत मुसळधार पाऊस, ५० किमी वेगाने वारे वाहणार

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि कॉमेडियन हिम्मताराम खदाव यांनी सरपंचपदाची निवडणूक लढवली होती. इन्स्टाग्रामवर त्यांचे 11 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. फेसबुकवरही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. मात्र, सोशल मीडियावरील ही लोकप्रियता प्रत्यक्ष निवडणुकीत मतांमध्ये परिवर्तित होऊ शकली नाही. शुक्रवारी रात्री जाहीर झालेल्या निकालात हिम्मताराम खदाव यांना अवघी 444 मतं मिळाली. ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. गणपतराम माचरा यांनी सरपंचपदाची निवडणूक जिंकली, तर सुरेंद्र सिंह दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

11 LAKH FOLLOWERS BUT ONLY 444 VOTES
भाजपचा अजब कारभार! वर्षभरापूर्वी निधन झालेल्या नेत्याला कार्यकारिणीत स्थान; दिली मोठी जबाबदारी

20 लाख फॉलोअर्स असलेल्या ओमप्रकाश यांचाही पराभव

यापूर्वी ओसियां पंचायत समितीमधील इंदों की ढाणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ओमप्रकाश बिश्नोई यांनाही पराभवाचा सामना करावा लागला होता. सोशल मीडियावर त्यांचे 20 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. मात्र, निवडणुकीत त्यांना अवघी 33 मतं मिळाली होती.

11 LAKH FOLLOWERS BUT ONLY 444 VOTES
Political News: मोठी बातमी! २ आमदारांचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

भीलवाड्यात इन्फ्लुएन्सरच्या पत्नीलाही पराभव

फक्त जोधपूरच नाही, तर भीलवाडा जिल्ह्यातही सोशल मीडियावरील लोकप्रियतेचा निवडणुकीत फायदा झालेला नाही. फुलियाखुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी राजस्थानमधील प्रसिद्ध फिटनेस यूट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर पवन साहू यांच्या पत्नी कोमल साहू (तेली) यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीची गावात चांगलीच चर्चा होती. मतदानादरम्यान बोगस मतदानाचे आरोपही करण्यात आले. यावरून पोलिसांसोबत वाद झाल्याची घटनाही घडली. मात्र रात्री मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निकाल कोमल साहू यांच्या विरोधात लागला. त्यांना 277 मतं मिळाली आणि त्या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.