देशावर पुन्हा चक्रीवादळाचं संकट! अनेक राज्यांत मुसळधार पाऊस, ५० किमी वेगाने वारे वाहणार

IMD Heavy Rainfall Alert For Multiple States In India: बंगालच्या उपसागरात नवीन चक्रीवादळ सक्रिय होण्याची शक्यता असून, 2 नोव्हेंबरला आंध्र प्रदेश किनारपट्टीवर त्याचा प्रभाव जाणवू शकतो.
CYCLONE ALERT IN INDIA
CYCLONE ALERT IN INDIAsaam tv
Published On: 

बंगालच्या उपसागरात एक नवं चक्रीवादळ सक्रिय होत असून, यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे. हे चक्रीवादळ 2 नोव्हेंबरच्या संध्याकाळच्या सुमारास आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेश, ओडिशासह अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने अरुणाचल प्रदेश, केरळ आणि आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. रविवारी या राज्यांतील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतातील काही भागांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

CYCLONE ALERT IN INDIA
भाजपचा अजब कारभार! वर्षभरापूर्वी निधन झालेल्या नेत्याला कार्यकारिणीत स्थान; दिली मोठी जबाबदारी

वादळी वाऱ्यांसह 'या' राज्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस

येत्या काही दिवसांत देशातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. दक्षिण, पूर्व आणि ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडू शकतो. तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रविवारी अरुणाचल प्रदेश, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, केरळ आणि माहे येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. ओडिशामध्ये वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज असून, ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

CYCLONE ALERT IN INDIA
राजकारणात खळबळ! माजी मुख्यमंत्र्यांना जोरदार झटका; माजी आमदारासह महत्वाच्या ३ नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

आंध्र प्रदेश, अंतर्गत कर्नाटक, केरळ, माहे आणि तेलंगणामध्येही काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होऊ शकतो. या भागांमध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. तर छत्तीसगड, किनारपट्टीवरील कर्नाटक, पूर्व मध्य प्रदेश, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल आणि विदर्भातही वादळी वाऱ्यांसह विजा कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 1 आणि 2 नोव्हेंबरदरम्यान केरळ, आंध्र प्रदेश, यानम, किनारपट्टीवरील कर्नाटक, रायलसीमा आणि तेलंगणामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.