भाजपचा अजब कारभार! वर्षभरापूर्वी निधन झालेल्या नेत्याला कार्यकारिणीत स्थान; दिली मोठी जबाबदारी

Ram Surat Maurya BJP Committee Appointment Controversy: उत्तर प्रदेश भाजपच्या कामगार संघटनेच्या 11 सदस्यीय कार्यकारिणीच्या यादीत वर्षभरापूर्वी निधन झालेल्या राम सूरत मौर्य यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे.
DECEASED LEADER NAMED IN UTTAR PRADESH EXECUTIVE COMMITTEE
DECEASED LEADER NAMED IN UTTAR PRADESH EXECUTIVE COMMITTEEsaam tv
Published On: 

उत्तर प्रदेशातील भाजपच्या कामगार संघटनेच्या कार्यकारिणीची यादी जाहीर झाल्यानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक वर्षापूर्वी निधन झालेल्या भाजपच्या एका नेत्याला या कमिटीत सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपच्या संघटनात्मक कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शनिवारी रात्री उशिरा भाजपच्या कामगार संघटनेत 11 सदस्यांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत आंबेडकरनगर जिल्ह्यातील टांडा येथील दिवंगत भाजप नेते राम सूरत मौर्य यांचे नाव सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र राम सूरत मौर्य यांचे सुमारे वर्षभरापूर्वीच निधन झाले आहे.

DECEASED LEADER NAMED IN UTTAR PRADESH EXECUTIVE COMMITTEE
२ आमदारांनी कमळ घेतलं हातात, पण अचानक घेतला यू-टर्न; म्हणाले भाजपमध्ये प्रवेश झालाच नाही, २४ तासांत नेमकं काय झालं?

या प्रकाराची माहिती समोर येताच सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलय. विशेष म्हणजे पक्षासाठी योगदान देणाऱ्या या कार्यकर्त्यांची हयातील दखल घेण्यासाठी संघटनेकडून विशेष प्रयत्न झाले का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. निधनानंतर त्यांना पदाधिकारी करण्यात आल्याने कार्यकर्त्याप्रती संघटनेची संवेदनशीलता आणि जबाबदारी यावरही चर्चा सुरू झाली आहे. कार्यकारिणीची यादी जाहीर करण्यापूर्वी जिल्हा संघटनेकडून माहिती किंवा अभिप्राय घेण्यात आला होता का? अभिप्राय घेतला असेल तर ही चूक कशी झाली, असे सवालही उपस्थित होत आहेत.

DECEASED LEADER NAMED IN UTTAR PRADESH EXECUTIVE COMMITTEE
Election: मोठी बातमी! राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर, मतदान अन् निकाल कधी?

दरम्यान, आंबेडकरनगरचे भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप देव पटेल यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. यादीत कुठेतरी चूक झाल्याचं त्यांनी मान्य केलं असून, याबाबत प्रदेश कमिटीला माहिती देण्यात आल्याचं सांगितलं आहे. लवकरच सुधारित यादी जाहीर केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.