२ आमदारांनी कमळ घेतलं हातात, पण अचानक घेतला यू-टर्न; म्हणाले भाजपमध्ये प्रवेश झालाच नाही, २४ तासांत नेमकं काय झालं?

Bihar Politics : बिहारमध्ये दोन अपक्ष विधान परिषद सदस्यांच्या भाजप प्रवेशावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. बंशीधर ब्रजवासी आणि डॉ. राहुल राज यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश केला नसून केवळ पाठिंबा दिल्याचे स्पष्ट केले.
Who are Banshidhar Brajwasi and Rahul Raj
Who are Banshidhar Brajwasi and Rahul RajSaam TV
Published On: 

Who are Banshidhar Brajwasi and Rahul Raj : बिहार विधान परिषद निवडणुकीत जेडीयूच्या उमेदवारांचा पराभव करून भाजपमध्ये दाखल झालेल्या दोन अपक्ष आमदारांनी अवघ्या २४ तासांतच यू-टर्न घेतला आहे. पक्षांतर बंदी कायद्यावरून प्रश्न उपस्थित झाल्यानंतर बिहारमधील सत्ताधारी (Bihar MLC BJP entry controversy) एनडीएसमोर एक नवीन राजकीय आणि घटनात्मक आव्हान उभे राहिले आहे. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी आपण पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला नसून केवळ पाठिंबा दिला असल्याचे सांगत माघार घेतली आहे. indiatoday याने याबाबतचे वृत्त दिले आहे. (What is the anti defection law in India)

तिरहुत पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेले बंशीधर ब्रजवासी आणि सारण शिक्षक मतदारसंघातून विजयी झालेले डॉ. राहुल राज यांनी भाजपमध्ये (MLCs join a political party) प्रवेश केला होता. या दोन्ही अपक्ष उमेदवारांनी विधान परिषद निवडणुकीत भाजपचा एनडीए मित्रपक्ष असलेल्या जेडीयूच्या उमेदवारांचा पराभव केला होता. त्यांनी शनिवारी एका कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केल्याचं समोर आले. त्यानंतर हा पक्ष प्रवेश घटनात्मक वादात सापडला. पक्षांतरबंदी कायद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर दोन्ही आमदारांनी भाजपात सामील होण्याबाबत भूमिका बदलली आहे. या दोन नेत्यांनी सुरुवातीला प्रसारमाध्यमांना सांगितले की ते भाजपमध्ये सामील झाले आहेत, पण नंतर फक्त पाठिंबा दिल्याचा त्यांनी दावा केला.

Who are Banshidhar Brajwasi and Rahul Raj
दोन रुपयांत प्रॉपर्टी, ४० लग्जरी विला अन् कोट्यवधींची कमाई; IAS-IPS नवरा-बायकोच्या आलिशान काळ्या कमाईचा पर्दाफाश

बंशीधर ब्रजवासी आणि डॉ. राहुल राज यांनी विजयानंतर भाजपच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली. त्याठिकाणी ते भाजपात सामील होताना दिसले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री सम्राट चौधरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी आणि बिहार भाजपचे प्रभारी हरीश द्विवेदी हेही उपस्थित होते. कार्यक्रमानंतर दोन्ही विधान परिषद सदस्य बाहेर आले आणि त्यांनी प्रसारमाध्यमांना भाजपमध्ये सामील झाल्याचे सांगितले. पण त्यांच्या सदस्यत्वावरून आणि पक्षांतरबंदी कायद्यावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर त्यांनी भाजपला फक्त पाठिंबा दिला आणि औपचारिकपणे पक्षात सामील झाले नव्हते, असे सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी यांनीही त्यांच्या स्पष्टीकरणाला पाठिंबा दिला. त्यांनी सांगितले की, त्या दोन विधान परिषद सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता.

Who are Banshidhar Brajwasi and Rahul Raj
१२ पैकी ११ आमदार फुटले अन् भाजपात प्रवेश; एकट्या पडलेल्या पक्षाध्यक्षांनी सोडलं मंत्रिपद; राजकारणात खळबळ

विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी संविधानाच्या दहाव्या अनुसूचीच्या कलम 2(2) चा हवाला देत दोन्ही विधान परिषद सदस्यांच्या अपात्रतेची मागणी केली आहे. या तरतुदीनुसार सभागृहात निवडून आलेला अपक्ष सदस्य निवडणुकीनंतर राजकीय पक्षात सामील झाल्यास अपात्र ठरतो. तेजस्वी यांनी भाजपवर संविधान आणि लोकशाहीची थट्टा केल्याचा आरोप केला. तसेच दोन्ही विधान परिषद सदस्यांवर तात्काळ कारवाईची मागणी केली. दरम्यान, घटनेनुसार, बिहार विधान परिषदेच्या अध्यक्षांना दहाव्या अनुसूचीअंतर्गत अपात्रतेच्या प्रकरणांवर निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

Who are Banshidhar Brajwasi and Rahul Raj
Fact Check : महाराष्ट्रातील रेशन कार्डधारकांना ९००० रुपये मिळणार, सुनेत्रा पवारांच्या नावाने मेसेज व्हायरल, सत्य आलं समोर

राहुल राज आणि बंशीधर ब्रजवासी यांनी भाजपमध्ये औपचारिकपणे प्रवेश केला की फक्त पाठिंबा दिला, अशी चर्चा बिहारच्या राजकारणात सुरू झाली आहे. भाजपच्या कार्यक्रमानंतरची दोन्ही आमदारांची सुरुवातीची वक्तव्ये आणि त्यांनी सोशल मीडियावर दिलेलं स्पष्टीकरण, तसेच इतर उपलब्ध पुराव्यामुळे आता नेमकं काय होणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सिद्ध झाल्यास पक्षांतरबंदी कायद्यानुसार त्यांना अपात्र ठरवले जाऊ शकते. पण केवळ राजकीय पक्षाला पाठिंबा दिल्याने आपोआप अपात्रता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.