Fact Check : महाराष्ट्रातील रेशन कार्डधारकांना ९००० रुपये मिळणार, सुनेत्रा पवारांच्या नावाने मेसेज व्हायरल, सत्य आलं समोर

Maharashtra ration card : महाराष्ट्रातील रेशन कार्डधारक महिलांना ९ हजार रुपये मिळणार असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.
Fact Check on Fake Sunetra Pawar Video Claiming ₹9,000 Aid for Ration Card Women
Maharashtra Government Fact-Checks Viral ₹9,000 Scheme ClaimSaam tv (AI)
Published On: 

₹9000 scheme for ration card holders in Maharashtra fact check : महाराष्ट्रातील रेशन कार्डधारक महिलांना ९ हजार रुपये देण्यात येणार आहेत, अशी घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घोषणा केल्याचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR Govt of Maharashtra) या प्रकरणाची गंभीर दखल घेत अधिकृत फॅक्ट चेक जाहीर केले आहे. या तपासणीनुसार उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी रेशन कार्डधारक महिलांना ९ हजार रुपये देण्याबाबत अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. (Maharashtra government viral message fact check)

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अशी कुठलीही घोषणा केलेली नाही. व्हायरल व्हिडिओमध्ये एआय निर्मित दृश्ये आणि जुन्या भाषणाचे फुटेज वापरण्यात आले आहे. या व्हायरल होणाऱ्या दाव्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. सुनेत्रा पवार अथवा महाराष्ट्र सरकारकडून अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. अथवा याबाबतचा जीआर काढण्यात आला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला मेसेज पूर्णपणे खोटा अन् दिशाभूल करणारा आहे.

Sunetra Pawar viral video truth
Sunetra Pawar viral video truthMaharashtra government viral message fact check

सध्या सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की महाराष्ट्रातील रेशन कार्डधारक महिलांना शासनाकडून ९ हजार रुपयांचे विशेष अनुदान दिले जाणार आहे. इतकेच नव्हे तर, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी एका जाहीर कार्यक्रमात ही मोठी घोषणा केल्याचे भासवत एक व्हिडिओही फिरवला जात आहे. परंतु, या व्हायरल दाव्यामध्ये अजिबात तथ्य नसून ही संपूर्ण बातमी खोटी आणि दिशाभूल करणारी आहे.

Fact Check on Fake Sunetra Pawar Video Claiming ₹9,000 Aid for Ration Card Women
१२ पैकी ११ आमदार फुटले अन् भाजपात प्रवेश; एकट्या पडलेल्या पक्षाध्यक्षांनी सोडलं मंत्रिपद; राजकारणात खळबळ

या व्हायरल मेसेजचे फॅक्ट चेक करण्यात आले. त्यावेळी असे आढळून आले की, हा व्हायरल व्हिडिओ पूर्णपणे बनावट (Deepfake/AI Generated) आहे. यात लोकांची फसवणूक करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून कृत्रिम दृश्ये तयार करण्यात आली आहेत. सोबतच काही जुन्या भाषणांचे फुटेज जोडून तो अत्यंत चलाखीने एडिट करण्यात आला आहे जेणेकरून तो खरा वाटेल.

Fact Check on Fake Sunetra Pawar Video Claiming ₹9,000 Aid for Ration Card Women
दोन रुपयांत प्रॉपर्टी, ४० लग्जरी विला अन् कोट्यवधींची कमाई; IAS-IPS नवरा-बायकोच्या आलिशान काळ्या कमाईचा पर्दाफाश

अशा प्रकारच्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओ किंवा मेसेजवर नागरिकांनी कोणताही विश्वास ठेवू नये. कोणतीही खात्रीशीर माहिती नसताना असे मेसेज पुढे (Forward) करू नयेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. अशा कोणत्याही सरकारी योजनांची माहिती केवळ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा खात्रीशीर वृत्त स्रोतांकडूनच तपासून घ्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.