१२ पैकी ११ आमदार फुटले अन् भाजपात प्रवेश; एकट्या पडलेल्या पक्षाध्यक्षांनी सोडलं मंत्रिपद; राजकारणात खळबळ

Meghalaya Political Crisis : मेघालयमध्ये युनायटेड डेमोक्रेटिक पार्टीला मोठे खिंडार पडले आहे. पक्षाच्या १२ पैकी ११ आमदारांनी पक्ष सोडला असून, आठ जण भाजपमध्ये तर तीन जण एनपीपीमध्ये दाखल झाले आहेत.
Metbah Lyngdoh
Metbah LyngdohSaam TV
Published On: 

Who is Metbah Lyngdoh : मेघालयतील युनायटेड डेमोक्रेटिक पार्टीवर (UDP) मोठे राजकीय संकट ओढवले असून पक्षाला खिंडार पडले आहे. पक्षाच्या १२ पैकी ११ आमदारांनी पक्ष सोडत भाजप आणि एनपीपीमध्ये प्रवेश केला. या बंडानंतर पक्षात पूर्णपणे एक्‍टेच पडलेले मंत्री आणि पक्षप्रमुख मेटबाह लिंगदोह यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी (यूडीपी) ही एके काळी मेघालयाच्या राजकारणात किंगमेकर होती. पण हीच पार्टी सध्या स्वत:च्या अस्तित्वाच्या संकटाचा सामना करत आहे. पक्षांतर्गत फूट आणि बंडाचा परिणाम आता पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचला. यूडीपीच्या १२ पैकी ११ आमदारांनी पक्ष सोडला. त्यापैकी आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर तिघांनी मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांच्या एनपीपीमध्ये प्रवेश केला.

Metbah Lyngdoh
दोन रुपयांत प्रॉपर्टी, ४० लग्जरी विला अन् कोट्यवधींची कमाई; IAS-IPS नवरा-बायकोच्या आलिशान काळ्या कमाईचा पर्दाफाश

पक्षाच्या बिकट परिस्थितीचा परिणाम त्यांच्या अध्यक्षांवर झाला आहे. मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांच्या नेतृत्वाखालील मेघालय डेमोक्रॅटिक अलायन्स (एमडीए) सरकारमधील माजी विधानसभा अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री मेटबाह लिंगडोह यांनी आपल्या कॅबिनेट पदाचा राजीनामा दिला.

Metbah Lyngdoh
NZ vs IND : अखेरच्या टी२० सामन्यात भारताच्या संघात २ बदल, मॅच विनर खेळाडूला संधी, वाचा दोन्ही संघाची प्लेईंग ११

राजीनामा देताना मेटबाह लिंगडोह म्हणाले की, बदललेल्या राजकीय परिस्थितीत पक्षाचे ११ आमदार सोडून गेले आहेत. त्यामुळे सभागृहातील मी एकमेव आमदार राहिलोय. त्यामुळे कॅबिनेट मंत्री म्हणून काम करत राहणे नैतिकदृष्ट्या अयोग्य आहे. त्यामुळे मंत्रि‍पदाचा मी राजीनामा देत आहे. दरम्यान मेटबाह यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सादर केला असून तो तात्काळ प्रभावाने मंजूर झाला आहे.

२०२३ च्या विधानसभा निवडणुकीत यूडीपीने १२ जागा जिंकून जबरदस्त कामगिरी केली होती. पण फक्त तीन वर्षांतच अंतर्गत कलहामुळे या पक्षाची घडी पूर्णपणे विस्कटली आहे. या मोठ्या घडामोडीनंतर मेघालयाच्या राजकारणातील समीकरणे पूर्णपणे बदलत असल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.