NZ vs IND : अखेरच्या टी२० सामन्यात भारताच्या संघात २ बदल, मॅच विनर खेळाडूला संधी, वाचा दोन्ही संघाची प्लेईंग ११

India vs New Zealand 5th T20 Playing XI : भारत-न्यूझीलंड पाचव्या टी२० सामन्यात मिचेल सँटनरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात दोन बदल करण्यात आले असून भुवनेश्वर कुमार आणि वरुण चक्रवर्तीला संधी मिळाली आहे.
bhuvneshwar kumar
bhuvneshwar kumartwitter
Published On: 

India vs New Zealand final T20 match updates : अखेरच्या टी२० सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ५ सामन्याची टी२० मालिका भारताने ३-१ ने जिंकली आहे. अखेरचा टी२० सामना आज होत आहे. या सामन्यात न्यूझीलंडने भारताला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले आहे. न्यूझीलंडच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. भारतीय संघातही महत्त्वाचे २ बदल कऱण्यात आले आहे. भुवनेश्वर कुमार याला प्लेईंग ११ मध्ये संधी देण्यात आली आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ५ व्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. प्रथम गोलंदाजी घेण्यामागचे कारण सांगताना सँटनर म्हणाला की, सामन्याच्या उत्तरार्धात दव येण्याची शक्यता आहे. तसेच न्यूझीलंड संघात एक बदल करण्यात आला आहे. मॅट फिशरच्या जागी टायकर (Ticker) याला प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळाले आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात टॉस हारल्यानंतर भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, आमची प्रथम फलंदाजी करण्याचीच इच्छा होती. ऑकलंडच्या मैदानाचे डिमेशन्स वेगळे होते, पण Glenn Phillips ने खेळलेल्या उत्कृष्ट खेळीचे श्रेय त्याला दिले पाहिजे. भारतीय संघात दोन मोठे बदल करण्यात आले आहेत.

bhuvneshwar kumar
Speeding Challan Rules: हायवेवर चालान मिळण्याचे टेन्शन खल्लास! १२० च्या स्पीडवरही दंड नाही; जाणून घ्या नवीन नियम

वरुण चक्रवर्ती याला पहिल्यांदाच प्लेईंग ११ मध्ये स्थान देण्यात आले आहे. त्याशिवाय भुवनेश्वर कुमार याचेही कमबॅक झाले आहे. त्याला चौथ्या सामन्यात बेंचवर बसवण्यात आले होते. अक्षर पटेल आणि मयंक यादव यांना विश्रांती देण्यात आली आहे. वैभव सूर्यवंशी याला प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळेल, असा अंदाज वर्तवला जात होता. पण भारतीय संघाने फलंदाजीत कोणताही बदल केला नाही. फक्त गोलंदाजीमध्ये २ महत्त्वाचे बदल केले आहेत.

bhuvneshwar kumar
Ladki Bahin Yojana : १५०० रुपयात महिलांना विकत घेतलं जातंय, राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

भारताची प्लेईंग ११ (IND Playing XI)

संजू सॅमसन (Sanju Samson), अभिशेष शर्मा (Abhishek Sharma), इशान किशन (Ishan Kishan) - यष्टीरक्षक, श्रेयस अय्यर (Shreyas Iyer c) - कर्णधार, तिलक वर्मा (Tilak Varma), निशीश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy), नमन धीर (Naman Dhir), अर्शदीप सिंग (Arshdeep Singh), प्रिन्स यादव (Prince Yadav), वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy), भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar)

न्यूझीलंडची प्लेईंग ११ - (NZ (Playing XI)

टिम सायफर्ट (यष्टीरक्षक), फिन आलन, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेव्हन जेकॉब्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नेथन स्मिथ, ॲडम मिल्ने, जेकब डफी आणि ब्लेर टिकनर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.