
मयुरेश कडव, साम टीव्ही
वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि पाणीपुरवठ्याच्या समस्येविरोधात शिवसेनेच्या वतीने बदलापुरातील महावितरण आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी मडकं फोडून प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला.
गेल्या काही दिवसांपासून बदलापूर शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. तसंच अनेक भागात पाणीपुरवठ्याच्या समस्या आहेत. याचा जाब विचारण्यासाठी शिवसेनेच्या वतीने बदलापूर बाजारपेठ ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या.
मोर्चेकरांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत बदलापुरातील वीज आणि पाणीपुरवठ्याच्या समस्यांचा पाढा वाचला. बुधवारपर्यंत महावितरण आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासनाने आपला कारभार सुरळीत करावा तसंच जे अधिकारी दिलेलं आश्वासन पाळणार नाहीत. त्यांना घरी पाठवण्याची व्यवस्था करू असा इशारा यावेळी शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी दिला.
बदलापूर रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या स्कायवॉकच्या पायऱ्या धोकादायक
बदलापूर रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या स्कायवॉकच्या पायऱ्यांची अतिशय दूरवस्था झाली आहे. त्या अतिशय धोकादायक बनल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होतीय. या स्कायवॉकच्या अनेक पायऱ्यांवरील लाद्या तुटलेल्या आहेत. पावसाळ्यात याठिकाणी पाणी साचत असल्यानं प्रवाशांना पायऱ्यांचा अंदाज येत नाही, त्यामुळे पाय घसरून अपघात होतायेत. त्यामुळे नगरपालिकेनं लवकरात लवकर या पायऱ्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवाशांनी केलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.