Maharashtra Politics : काँग्रेसची पिढी संघर्ष करायला तयार नाही, संजय राऊतांच्या टीकेला भाजपमध्ये गेलेल्या कुणाल पाटलांनी काय प्रत्युत्तर दिलं?

kunal patil on sanjay Raut : कुणाल पाटील यांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. कुणाल पाटील हे साम टीव्हीच्या विशेष मुलाखतीत बोलत होते.
Kunal Patil News
Kunal Patil Saam tv
Published On

काँग्रेसला लागलेली गळतीच सुरुच आहे. दोन दिवसांपूर्वी धुळ्यातील माजी आमदार कुणाल पाटील यांनी कमळ हाती घेतलं. कुणाल पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची पक्ष सोडण्याची मालिका सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. कुणाल पाटील यांच्या पक्षप्रवेशावरून काँग्रेसची पिढी संघर्ष करायला तयार नसल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. संजय राऊत यांच्या टीकेला आता माजी आमदार कुणाल पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

कुणाल पाटील यांनी साम टीव्हीच्या 'ब्लॅक अँड व्हाइट' मुलाखतीत विविध प्रश्नांना प्रत्युत्तर दिलं. संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना कुणाल पाटील म्हणाले, 'काँग्रेसने गेल्या ३०-४० वर्षांत काम केले असे म्हणणार नाही. काँग्रेसने काम केले. परंतु २०१४ साली मी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. वडिलांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पुढील जबाबदारी मी घेतली होती. त्यावेळी वडिलांनी काँग्रेस पक्षाला तिकीट देऊ नका, असं सांगितलं'.

Kunal Patil News
Beed : धक्कादायक! बीडमध्ये वारकऱ्याला मारहाण; वृद्ध व्यक्ती हताश होऊन पोलिस ठाण्यात गेला, पण...

'वडिलांनी माझ्याऐवजी मुलगा कुणाल पाटील यांना तिकीट देण्याचं सांगितलं. त्यावेळी सोनिया गांधी यांनी सहमती दर्शवली होती. मात्र, शेवटच्या मिनिटाला तिकीट नाकारलं. त्यांनी वडिलांनाच निवडणूक लढण्यास सांगितली. परंतु वडील निवडणूक लढण्यास तयार नव्हते. त्यामुळे अपक्ष लढावं, असा विचार मनात आला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला, असे कुणाल पाटील म्हणाले.

Kunal Patil News
Taj Mahal Agra Firing : भाजप नेत्याचा ताजमहल परिसरात गोळीबार; पोलिसांनी आवळल्या मुसक्या, चौकशीत सांगितलं अजब कारण

'देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की, काँग्रेस तुम्हाला तिकीट देणार नाही. भाजपचा एबी फॉर्म पाठवतो, असे सांगितलं. त्यावेळी त्यांना नकार दिला. त्यावेळीही रडलो नाही. तेव्हा ५० हजार मतांनी जिंकलो. २०१९ साली काँग्रेसची सभा लावली. २०१९ साली निवडणुकीसाठी राहुल गांधींनी अर्ज केला. संघर्ष करण्याची तयारी होती. तेव्हाही भाजपने ऑफर दिली होती. २०१९ साली काँग्रेसकडून निवडणूक लढवली. त्यांना पार्श्वभूमीवर माहीत नाही. विषय संघर्षाचा नाही. संघर्ष करण्याची तयारी कायमस्वरुपी राहील, असे कुणाल पाटील यांनी सांगितलं.

Kunal Patil News
Raj Thackeray : समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे परंतु...; राज ठाकरेंचा पुन्हा फडणवीस सरकारला इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com