Taj Mahal Agra Firing : भाजप नेत्याचा ताजमहल परिसरात गोळीबार; पोलिसांनी आवळल्या मुसक्या, चौकशीत सांगितलं अजब कारण

Taj Mahal agra firing update : भाजप नेत्याचा ताजमहल परिसरात गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
Taj Mahal News
Taj Mahal Agra Firing Saam tv
Published On

ताजमहलच्या पश्चिम गेट पार्किंगजवळील पिवळ्या झोन बॅरिअरजवळ सोमवारी गोळीबार झाल्याची घटना घडली होती. गोळीबार करणारा आजमगढचा भाजप नेता आणि एलआयसी एजंट पंकज कुमार सिंह याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी पंकज गेल्या काही दिवसांपासून फरार होता.

आरोपी पंकजला लखनौ पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याचा ताबा आग्रा पोलिसांकडे सोपवला. पोलिसांनी आरोपी पंकजकडून लायसन्स रिवॉल्वर आणि तीन काडतुस्यांचे रिकामे खोके जप्त केले आहेत. या आरोपी पंकजने पोलीस चौकशीत गोळीबार करण्याचं अजब उत्तर दिलं आहे. मनाला वाटल्याने गोळीबार केल्याचं आरोपी पंकजने पोलिसांना सांगितलं.

Taj Mahal News
Devendra Fadnavis : विरोधकांच्या मराठीतील पत्रात व्याकरणाच्या २४ चुका; हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल

काय आहे संपूर्ण प्रकरण?

आरोपी पंकज पोलिसांना चकवा देऊन दुसऱ्या कारने फरार झाला होता. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी ताजमहलजवळील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर एका सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर भाजप नेता पंकजच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पोलिसांनी सात तासांच्या आतच आरोपी पंकजला आटक केली.

वरिष्ठ पोलीस अधिकारी सोनम कुमार यांनी सांगितलं की, 'ताजमहलच्या सुरक्षेत असलेले पोलीस राजन सिंह यांनी गोळीबारानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवला होता. पंकज सिंहने गोळीबार केल्याचा संशय होता. पोलीस चौकशीत पंकजने गोळीबार केल्याचं कबुल केले. त्यावेळी त्याने मनाला वाटल्याने गोळीबार केल्याचे सांगितले.

Taj Mahal News
Uddhav Thackeray : 'आम्ही दोघे भाऊ एकत्र आलो तर...'; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, VIDEO

टॅक्सी चालकवरही पोलिसांची कारवाई

वैद्यकीय चाचणीनंतर पोलिसांनी आरोपीला विशेष कोर्टात हजर केलं. त्यानंतर आरोपीची तुरुंगात रवानगी केली. या प्रकरणात टॅक्सी चालक नंदलालला देखील आरोपी बनवण्या आलं आहे. पंकज सिंहने गोळीबार केला होता. त्यानंतर टॅक्सी चालकाने पोलिसांना सूचना दिली नव्हती. टॅक्सी चालकाने आरोपी पंकजला फरार होण्यास मदत केली. त्यामुळे पंकजला मदत केल्या प्रकरणी टॅक्सी चालक नंदलालवर कारवाई करण्यात आली आहे.

Taj Mahal News
GST Council Meeting : दूध ते कपडे; दैनंदिन जीवनात लागणाऱ्या आवश्यक वस्तू स्वस्त होणार; सरकारचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट

पंकज आजमगडला दोन दिवसांपूर्वी वृदांवनला आला होता. पंकज पत्नी आणि मुलांना वृंदावनला सोडलं. त्यानंतर भाडेतत्वावरील कारने घेऊन आग्रा येथे आला होता. त्यानंतर पंकजने हा कारनामा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com