GST
gst council Meeting Saam tv

GST Council Meeting : दूध ते कपडे; दैनंदिन जीवनात लागणाऱ्या आवश्यक वस्तू स्वस्त होणार; सरकारचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट

gst council Meeting update : दैनंदिन जीवनात लागणाऱ्या आवश्यक वस्तू स्वस्त होण्याची मोठी शक्यता आहे. आज केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे.
Published on

केंद्र सरकार लवकरच सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्याची शक्यता आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीत १२ टक्के टॅक्सचा स्लॅब रद्द केला जाऊ शकतो. सरकारच्या निर्णयामुळे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या आवश्यक वस्तू स्वस्त होण्याची मोठी शक्यता आहे. यामध्ये दूध, दही पनीर, कपडे याचा समावेश आहे.

१२ टक्के जीएसटी स्लॅबमध्ये येणाऱ्या काही वस्तूंचा १८ टक्के जीएसटी स्लॅबच्या यादीत समावेश केला जाऊ शकतो. तर दैनंदिन जीवनात लागणाऱ्या आवश्यक वस्तूंचा समावेश ५ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये समावेश केला जाऊ शकतो. सरकराने १२ टक्के जीएसटी स्लॅब रद्द केल्यास अनेक वस्तू स्वस्त होऊ शकतात.

GST
Eknath Shinde News : चहापान कार्यक्रमात एकनाथ शिंदे का भडकले? पाहा व्हिडिओ

१२ टक्के जीएसटी स्लॅबमध्ये येणाऱ्या आवश्यक वस्तूंची यादी

लोणी, तूप, प्रक्रिया केलेले पदार्थ, बदाम, मोबाईल, फळांचा रस, भाज्या, फळे, लोणचे, मुरांबा, चटणी, जाम, जेली, नारळ पाणी, छत्री, १००० रुपयांहून अधिक किंमतीचे कपडे, १००० रुपयांपर्यंतचे बुट इत्यादी वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.

GST
Uddhav Thackeray : 'आम्ही दोघे भाऊ एकत्र आलो तर...'; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, VIDEO

१२ टक्के जीएसटी स्लॅबमध्ये येणाऱ्या सेवा

हॉटेल रुम, (प्रति रात्र भाडे ७५०० रुपयांपर्यंत),नॉन इकोनॉमिक क्लास (हवाई प्रवास) , काही मल्टिमॉडल ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस आणि कमर्शियल सेवा इत्यादी सेवांचा समावेश आहे.

१२ टक्के जीएसटी स्लॅब रद्द केल्यानंतर त्यातील दैनंदिन जीवनात लागणाऱ्या आवश्यक वस्तूंचा समावेश हा ५ टक्के टॅक्स स्लॅबच्या यादीत केला जाऊ शकतो. तर इतर वस्तूंचा समावेश हा १८ टक्के जीएसटी स्लॅबमध्ये समावेश करण्याचा विचार सूरु आहे. याबाबतचा अंतिम निर्णय जीएसटी परिषदेत घेण्यात येणार आहे.

GST
Indian Railways: रेल्वेचा क्रांतीकारी बदल; आरक्षण चार्टबाबत घेतला महत्वाचा निर्णय, प्रवाशांची सुविधा वाढणार, वाचा सविस्तर

सध्या भारतात जीएसटीचे ४ प्रकारचे जीएसटी स्लॅब आहेत. ५ टक्क्यांच्या जीएसटी स्लॅबमध्ये येणाऱ्या वस्तू कमी आहेत. त्यानंतर १२ टक्के जीएसटी स्लॅब रद्द करण्याचा विचार सरकारकडून सुरु आहे. १८ टक्के आणि २४ टक्क्यांचा जीएसटी स्लॅब कायम असणार आहे. सध्या महागाई कमी करण्यासाठी सरकारने १२ टक्क्यांचा जीएसटी स्लॅब रद्द करण्याचा विचार सुरु केला आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com