walmik karad News
walmik karad Saam tv

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांच्या हत्येआधी वाल्मिक कराडने कोणाला फोन केला होता? धक्कादायक माहिती समोर

Santosh Deshmukh Case update : संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाबाबत आणखी एक महत्वाची अपडेट हाती आली आहे. विजयसिंह बाळा बांगर यांना हत्येआधी वाल्मिक कराडने धमकी दिल्याचा दावा केला.
Published on

योगेश काशिद, साम टीव्ही

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. या हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. यामुळे पोलिसांनीही तपासाचा वेग वाढवला आहे. या संतोष देशमुखांच्या हत्येआधी आरोपी वाल्मिक कराडने जुन्या सहकाऱ्यालाच धमकी दिल्याची बाब समोर आली आहे. 'तुला एका सरपंचाच्या हत्येच्या प्रकरणात अडकवणार असल्याची धमकी वाल्मिक कराडने विजयसिंह बांगर यांना दिली होती. विजयसिंह बाळा बांगर यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा केला.

walmik karad News
Taj Mahal Agra Firing : भाजप नेत्याचा ताजमहल परिसरात गोळीबार; पोलिसांनी आवळल्या मुसक्या, चौकशीत सांगितलं अजब कारण

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सात महिने पूर्ण झाले आहेत. मात्र या हत्या प्रकरणांमध्ये दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या माध्यमातून मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडचे नवनवीन कारनामे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. वाल्मिक कराडचा जुना सहकारी विजयसिंह बाळा बांगर यांनी आज धक्कादायक खुलासा केला केला आहे.

walmik karad News
Maharashtra Politics : काँग्रेसची पिढी संघर्ष करायला तयार नाही, संजय राऊतांच्या टीकेला भाजपमध्ये गेलेल्या कुणाल पाटलांनी काय प्रत्युत्तर दिलं?

बांगर यांनी सांगितलं की, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या एक तासाआधी मला वाल्मीक कराडने फोन करून तुला आता एका सरपंचाच्या हत्येमध्ये गुंतवणार आहे. तुमची सरपंच परिषद आणि तुमची सरपंचकी आता गेली. तुला त्याच्या मॅटरमध्ये मी आता गुंतवत आहे अशी धमकी वाल्मीक कराडने विजयसिंह बाळा बांगर यांना दिली होती.

walmik karad News
Viral Video : प्रसिद्ध मंदिराच्या प्रसादात आढळला मेलेला झुरळ; भाविकांमध्ये संतापाची लाट, VIDEO

संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या करण्याआधी धमकी कराडने बांगरला दिली होती. मी या प्रकरणावरती या अगोदर बोलणार होतो. मात्र माझ्यावर खोटेनाटे गुन्हे दाखल करून मला जेलमध्ये टाकले होते. आता तुरुंगातून जामीन मिळताच पत्रकार परिषद घेतली आहे. त्यानंतर संपूर्ण खुलासी केले आहेत. आज बुधवारी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये देखील माहिती दिली. यानंतर आता पोलीस काय कारवाई करणार, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com