

राज्यातील दोन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
अभिजीत चौधरी यांची PMRDA येथे नियुक्ती झालीये
योगेश म्हसे यांची अल्पसंख्यांक विकास विभागात बदली झालीये
राज्यातील २ बड्या आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. नागपूर महापालिकेचे आयुक्त अभिजीत चौधरी यांची बदली करण्यात आलीये.चौधरी यांच्या जागेवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महानगर आयुक्तांची जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिककाऱ्यांच्या बदलीचा निर्णय घेतला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून अधिकाऱ्यांचा बदल्यांचा धडाका सुरू आहे. मागील दोन आठवड्यात देखील आठ-दहा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी या आठवड्यातही दोन आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली आहे.
नागपूर मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महानगर आयुक्तपदावर बदली झाली आहे. तर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त योगेश म्हसे यांची सचिव, अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय येथे बदली करण्यात आली आहे. आता नागपूर मनपा आयुक्तपदाचा प्रभारी पदभार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे असणार आहे.
अभिजीत चौधरी यांच्या कारभारावर टीका
अभिजीत चौधरी यांना काम करताना टीकेचा सामना करावा लागला. विरोधी पक्षांनी अभिजीत चौधरी यांच्यावर जोरदार टीका केली. विरोधकांच्या टीकेला अभिजीत चौधरी यांनी कृतीतून उत्तरे दिली. त्यांनी राज्यात अनेक यशस्वी योजना राबवल्या. महापालिका रँकिंग सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. परंतु त्यांना यश आलं नाही.
नागपूर महापालिकेच्या आयुक्त आणि प्रशासकपदाची धुरा चौधरी यांनी यशस्वीरित्या सांभाळली. त्यांची ४ जुलै २०२३ रोजी नागपूर महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. डॉ. अभिजीत चौधरी हे मूळचे जळगावच्या भुसावळचे आहेत. त्यांचं शिक्षण वैद्यकीय क्षेत्रात झालंय. त्यांनी २००८ साली एमबीबीएस पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्यास सुरुवात केली. वैद्यकीय क्षेत्रासारखं स्पर्धा परीक्षेत त्यांना यश मिळालं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.