देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, भाजपकडे बिहारचं मुख्यमंत्रिपद?

Nitish Kumar News : राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नितीश कुमार राज्यसभेवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Bihar Politics
Bihar Politics Saam tv
Published On
Summary

बिहारच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

नितीश कुमार राज्यसभेवर जाण्याची जोरदार चर्चा आहे

बिहाराचं मुख्यमंत्रीपद रिक्त झाल्यास भाजपकडे सत्ता जाण्याची शक्यता

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना राज्यसभेवर पाठवण्याची जोरदार चर्चा आहे. जनता दल यूनायडेट पक्षाअंतर्गत मोठा उलटफेरविषयी चर्चा सुरू आहे. नितीश कुमार यांना राज्यसभेवर पाठवल्यास बिहारची मुख्यमंत्र्यांची खुर्ची रिक्त होणार आहे. त्यामुळे बिहारमध्ये मुख्यमंत्रिपद भाजपकडे जाण्याची चर्चा देखील सुरू झाली आहे.

नितीश कुमार राज्यसभेवर गेल्यास भाजपला बिहारचं मुख्यमंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. या चर्चेने देशातील राजकारण ढवळून निघालं आहे. राज्यसभा निवडणुकीमुळे प्रशासन आणि राजकीय वर्तुळात फेरबदल होताना दिसत आहेत. या निवडणुकीसाठी जेडीयू आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्व पातळीवर सुरू झाली आहे.

नितीश कुमार यांच्या राज्यसभेच्या जाण्याच्या चर्चेमुळे बिहारची सत्ता कोणाकडे जाणार, यावरून चर्चा सुरू झाली आहे. नितीश कुमार केंद्रात मोठी भूमिका स्वीकारू शकतात. तर भाजप बिहारच्या मुख्यमंत्रि‍पदावर दावा करू शकते. बिहारमधील संख्याबळानुसार भाजपकडून दावा ठोकणे स्वाभाविक मानले जात आहे.

Bihar Politics
लव्ह मॅरेजनंतर तातडीनं घटस्फोट; पुण्यातील महिलेने पतीला दिले 50 हजार

जनता दल यूनायडेटचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा हे दिल्लीहून तातडीने पटना येथे आल्याने चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला राज्यसभेसाठी नितीश कुमार यांचा मुलगा निशांत यांचं नाव पुढे आलं होतं. परंतु अचानक नितीश कुमार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. जेडीयूचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा आज सकाळी सकाळी दिल्लीहून पटना येथे आले. पटना येथे येण्याआधी केंद्रीय मंत्री ललन सिंह यांच्याशी चर्चा केली. संजय झा हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत.

Bihar Politics
ऐन धुळवडीत निवडणुकीचा धुरळा उडाला; आसामध्ये काँग्रेसकडून ४२ उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला कुठून संधी?

नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार हे गेल्या अनेक दिवसांपासून राजकारणात येणार असल्याची चर्चा आहे. मागील काही दिवसांपासून निशांत कुमार सार्वजनिक कार्यक्रमात दिसत आहे. वडिलांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या दिवशी त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. निशांत कुमार यांनी १ मार्च रोजी वडिलांना केक खाऊ घातला. त्यानंतर हनुमान मंदिराज जाऊन पूजा केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com