राजकारणात मोठा उलटफेर; सत्ताधारी पक्षाची ताकद वाढली, ५ बड्या नेत्यांचा प्रवेश

Tamilnadu political news : तामिळनाडूच्या राजकारणात मोठा उलटफेर झाला आहे. ५ नेत्यांच्या पक्षप्रवेशाने सत्ताधारी पक्षाची ताकद वाढली आहेत .
tamil nadu news
tamil nadu Saam tv
Published On
Summary

तामिळनाडूच्या राजकारणात मोठा उलटफेर

टीव्हीके पक्षाची ताकद वाढली

विरोधी पक्षातील ५ जणांचा टीव्हीके पक्षात प्रवेश

तामिळनाडू अभिनेते विजय यांच्या तमिलगा वेत्री कझगम (TVK) पक्षाची ताकद आणखी वाढली आहे. विरोधी पक्षातील ५ जणांनी टीव्ही पक्षात प्रवेश केला आहे. यात ४ AIADMK चे माजी मंत्री आणि एका डीएमकेच्या माजी आमदाराचा समावेश आहे.

टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय यांनी राजकारणात एन्ट्री घेतल्यानंतर थेट मुख्यमंत्री झाले. तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत टीव्हीके पक्षाने चांगली कामगिरी केली. तामिळनाडूतील घटक पक्षाच्या मदतीने टीव्हीके पक्षाने सत्ता स्थापन केली.

tamil nadu news
तमिळनाडूचं राजकारण मोक्याच्या क्षणी फिरलं; थलपती विजय यांनी केलं मॅजिक, मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार?
tamil nadu news
४७ आमदारांचा राजकीय पक्ष फुटला; 3 आमदारांचा तडकाफडकी राजीनामा, राजकारणात मोठी खळबळ

थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षात ५ नेत्यांनी प्रवेश केला. यात AIADMK पक्ष हा तामिळनाडूतील सर्वात जुना पक्ष आहे. ऐककाळी AIADMK पक्षाचं सरकार होतं. त्यांच्या पक्षातील ४ माजी मंत्र्यांनी टीव्हीके पक्षाने प्रवेश केला.

एमसी संपत, एनआर शिवापती, कडंबूर सी राजू आणि उदुमलाई के राधाकृष्णन यांनी टीव्हीके पक्षात प्रवेश केला. AIADMK सरकारमध्ये चारही जण मंत्री होते. सर्व नेत्यांना राजकारणाचा चांगला अनुभव आहे.

डीएमके पक्षाचे जे. करुणानिधी यांनीही टीव्हीके पक्षात प्रवेश केला आहे. तामिळनाडू डीएमके आणि एआयएडीएमके पक्ष हे विरोधी पक्षात आहे. डीएमके आणि एआयएडीएमके हे दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. परंतु दोन्ही पक्षातील नेत्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला आहे. थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षात मागील काही दिवसांपासून नेत्यांची इनकमिंग सुरू आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता तामिळनाडूत टीव्हीके पक्ष मजबूत स्थितीत आहे, त्यामुळे अनुभवी नेतेही टीव्हीके पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत.

tamil nadu news
देशातील आणखी एक पक्ष फुटला; पाठिंब्यावरून पडले २ गट, राजकीय वर्तुळात खळबळ

तामिळनाडूच्या आगामी सर्व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीव्हीके पक्षाची ताकद मजबूत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील अनुभवी नेतेही टीव्हीके पक्षात प्रवेश करणे पसंत करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com