

तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ
तामिळनाडूत ४७ आमदारांचा राजकीय पक्ष फुटला
तामिळनाडूतील ३ आमदारांनी दिला तडकाफडकी राजीनामा
तामिळनाडू राज्यात टीव्हीके पक्ष प्रमुख विजय यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तामिळनाडूत आज सोमवारी एआयडीएमके पक्षाच्या तीन आमदारांनी राजीनामा देत टीव्हीके पक्षात प्रवेश केला आहे. तिघांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळ त्रिची पूर्व मतदारसंघासह एकूण ४ राज्यात पोटनिवडणुका होण्याची शक्यता आहे.
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत टीव्हीके पक्षाचे १०७ आमदार जिंकून आले होते. या निवडणुकीत जिंकून आलेल्या तीन आमदारांची तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला आहे. मरगथम कुमारेसन (मधुरंतकम), सत्यभामा (धारापुरम), जयकुमार (पेरुंदुरई) यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
एआयडीएमके पक्षाच्या तीन आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवला. त्यानंतर मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारमधील मंत्री आधव अर्जुन यांची भेट घेतली. त्यानंतर टीव्हीके पक्षात प्रवेश केला. तीन आमदारांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत एडप्पाडी के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वात एआयडीएमके पक्षाने ४७ जागांवर विजय मिळवला होता.
एआयडीएमके पक्षाच्या तीन आमदारांनी टीव्हीके पक्षात प्रवेश केल्याने आता ४ मतदारसंघात पोटनिवडणुका होण्याची शक्यता आहे. टीव्हीके पक्षाने ४ जागांवर बाजी मारल्यास विजय सरकारला बहुमताचा आकडा गाठणे सोपे जाईल.
तत्पूर्वी, मुख्यमंत्री विजय यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यास, त्यात एआयडीएमके पक्षाच्या आमदारांना मंत्रिपद देण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. यावरून डाव्या राजकीय पक्षांनी टीव्हीके सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची धमकी दिली होती.
आता राजीनामा देणाऱ्या आमदारांनी पोटनिवडणुकीत बाजी मारल्यास टीव्हीके सरकार सहज बहुमताचा आकडा गाठेल. त्यामुळे त्यांना सहकारी पक्षावर विसंबून राहावे लागणार नाही. एआयडीएमके पक्षाच्या दिनाकरन यांनी राजीनामा देणाऱ्या तिन्ही आमदारांना निलंबित केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.