Shocking: खेळताना तोल गेला, १२ व्या मजल्यावरून पडून ४ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; रडून रडून आईचे बेहाल

Naigaon News: मुंबईनजीकच्या नायगावमध्ये भयंकर घटना घडली. १२ व्या मजल्यावरून पडून ४ वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. खेलताना तोल गेला आणि ही मुलगी खाली पडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
Shocking: खेळताना तोल गेला, १२ व्या मजल्यावरून पडून ४ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; रडून रडून आईचे बेहाल
Naigaon News Saam Tv
Published On

मनोज तांबे, नालासोपारा

१२ व्या मजल्यावरून पडून ४ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईनजीकच्या नायगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली. खेळताना तोल गेला आणि चिमुकली आईच्या डोळ्यासमोर खाली पडली. या घटनेमुळे नायगावमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नायगाव पोलिस ठाण्यामध्ये घटनेची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव पूर्वमध्ये ही धक्कादायक घटना घडली. नवकार फेस-१ ही १४ मजल्यांची सोसायटी आहे. या सोसायटीमधील एका बिल्डिंगच्या १२ व्या मजल्यावरून पडून ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री ८ वाजता ही घटना घडली. अनविका प्रजापती असं मृत्यू झालेल्या चिमुकल्या मुलीचे नाव होते. नावकार सोसायटीतील बी- 2 मध्ये ही चिमुकली आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती.

नेहमीप्रमाणे चिमुकली घराच्या समोरील गॅलरीत खेळत होती. गॅलरीत चप्पलचा स्टॅण्ड ठेवला होता. त्यावर चढून ही मुलगी खेळत होती. खेळता खेळता तिचा तोल गेला आणि ती १२ व्या मजल्यावरून खाली पडली. आईच्या डोळ्यासमोर ही मुलगी खाली पडली. त्यानंतर एकच खळबळ उडाली. गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीला तात्काळ वसईतील महापालिकेच्या सर डी एम पेटिट रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तोपर्यंत उशिर झाला होता. डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.

Shocking: खेळताना तोल गेला, १२ व्या मजल्यावरून पडून ४ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; रडून रडून आईचे बेहाल
Shocking News : विद्यार्थ्याला शिक्षा करणं भोवलं; शिक्षकाला तब्बल १ लाख रुपये दंड आणि ६ महिने तुरुंगवास

नायगावमधील नवकार सोसायटीमध्ये १४ मजल्यांचे टॉवर असतानाही त्या टॉवरच्या गॅलरीला सुरक्षात्मक ग्रील नसल्याने ही दुर्दैवी घटना घडली असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. मुलीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे नवकार सोसायटीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेचा सध्या पोलिस तपास करत आहेत.

Shocking: खेळताना तोल गेला, १२ व्या मजल्यावरून पडून ४ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; रडून रडून आईचे बेहाल
Shocking News : विद्यार्थ्याला शिक्षा करणं भोवलं; शिक्षकाला तब्बल १ लाख रुपये दंड आणि ६ महिने तुरुंगवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com