Flat Maintenance : फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांना फटका; सोसायटी मेटेनन्स १८ टक्क्यांनी वाढणार, वाचा सविस्तर, VIDEO

Flat Maintenance news : तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे...कारण, तुम्ही भरत असलेल्या मेटेनन्सवर जीएसटी भरावा लागणार आहेत...होय, असा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल होतोय...त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
Flat Maintenance
Flat Maintenance news :Saam tv
Published On

तुम्हीही हा व्हिडिओ पाहून हैराण व्हाल...कारण, आता तुम्ही भरत असलेल्या सोसायटी मेटेनन्सवरही 18 टक्के जीएसटी आकारला जात असल्याचा दावा करण्यात आलाय...हा व्हिडिओ व्हायरल होतोय...त्यामुळं खरंच असं आहे का...? मेटेनेन्सवर जीएसटी लावलाय का...? याचीच सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...

फ्लॅटमध्ये राहणं महागणार?

सोसायटी मेंटेनन्सवर 18 टक्के जीएसटी?

व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

आता हा व्हिडिओ व्हायरल होतोय. मेंटेनन्सवरही आता जीएसटी लावल्याने आणखी कुठे कुठे टॅक्स लावायचे ते लावा. असंच या व्हिडिओतील व्यक्ती म्हणतेय. त्यामुळे खरंच आता मेंटेनन्सवरील जीएसटी लावण्यात आलाय का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. राज्यभरात लाखो लोक फ्लॅटचं मेंटेनन्स भरतात.

7 हजार 500 रुपये टॅक्सही बरेच जण भरत असल्याने याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने एक्सपर्टची भेट घेतली...त्यांना व्हिडिओ दाखवून हे खरं आहे का? खरं असेल तर जीएसटी का लावण्यात आलाय याची सत्यता जाणून घेतलीय...

Flat Maintenance
Maharashtra Politics : राज्यातील आणखी एक राजकीय घराणं फुटलं, जयंत पाटील यांचा सख्खा भाऊ भाजपमध्ये जाणार

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

सोसायटीची वार्षिक उलाढाल 20 लाख असल्यास जीएसटी लागतो

दर महिन्याचा 7500 मेंटेनन्स असल्यास 18 टक्के जीएसटी

केंद्र सरकारने हा टॅक्स लागू केलाय

2017 मध्येच जीएसटी लागू करण्यात आला

Flat Maintenance
Beed Crime : कोयता पाठीमागे लपवून आणला, भाजप कार्यालयासमोरच आडवा पाडून कोयत्याने भोसकलं, बीडमध्ये रक्तरंजित थरार

सध्या दर महिन्याला 7 हजार 500 रुपये मेंटेनन्स भरणाऱ्याला जीएसटी लागतोय. मात्र, सरसकट सगळ्यांनाच हा टॅक्स सध्या लागू नाहीये. मात्र, 7500 रुपये सोसायटी मेटेनन्स भरणाऱ्यांना जीएसटी लागतो हा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com