Shocking News : विद्यार्थ्याला शिक्षा करणं भोवलं; शिक्षकाला तब्बल १ लाख रुपये दंड आणि ६ महिने तुरुंगवास

Crime News Vadodara : वडोदरा येथील शिक्षकाने विद्यार्थ्याला कानशिलात मारल्याने न्यायालयाने त्याला सहा महिने तुरुंगवास आणि १ लाख रुपये दंड ठोठावला आहे. पाच वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागल्याने चर्चेला उधाण आले आहे.
Vadodara Shocking News
Vadodara Saam tv
Published On

'छडी लगे छमछम, विद्या येई घमघम' हे बडबडगीत आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. मात्र शिक्षकाने या छडीच्या मर्यादा ओलांडल्या तर भयंकर परिणाम होऊ शकतो. एका शिक्षकाने शिक्षा देताना घडलेल्या घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. त्या एका शिक्षेने शिक्षकाचं आयुष्य बदललं आहे. विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून पाच वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा प्रवास आता धक्कादायक वळणावर येऊन ठेपला आहे.

वडोदरा येथील एका खासगी शिकवणीच्या शिक्षकाने दहावीच्या विद्यार्थ्याला कानफटात मारली. या घटनेनंतर संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला. धक्कादायक म्हणजे ही घटना २३ डिसेंबर २०१९ रोजी घडली होती. तब्बल पाच वर्षांनी या घटनेचा निकाल वडोदरा न्यायालयाने दिला आहे. विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी संबंधित शिक्षकाला १ लाख रुपये दंड आकारण्यात आला असून थेट सहा महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा देखील ठोठावण्यात आली आहे.

Vadodara Shocking News
Marathi School : मुंबईत मराठी शाळांची दैना, 6 वर्षांत 39 शाळा बंद | VIDEO

नेमकं काय घडलं ?

जसबीरसिंह चौहान २३ डिसेंबर २०१९ रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि सामाजिक शास्त्र शिकवत होता. त्याच्या वर्गातील एक मुलगा दोन दिवस शिकवणीला गैरहजर राहिला म्हणून शिक्षकाने त्याला वर्गातच जोरजोरात कानशिलात लगावल्या. या मारहाणीत त्याच्या कानाच्या पडद्यालाही इजा झाली आणि रक्तस्राव सुरू झाला.

Vadodara Shocking News
Dhule Zp School : शिक्षण व्यवस्थेचे तीन तेरा; जिल्हा परिषदेची शाळा भरतेय कुडाच्या झोपडीत

इतक्यात विद्यार्थ्याचे आई वडील फॉर्म भरण्याकरिता शाळेत आले होते. घडलेली घटना पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पालकांना बघताच क्षणी जसबीरसिंह याने त्यांची माफी मागितली. मात्र संतप्त झालेल्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि जसबीरसिंह विरोधात गुन्हा दाखल केला. तब्बल पाच वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर वडोदरा न्यायालयाने चौहान याला सहा महिने तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com