Maharashtra Politics : रमी खेळत नव्हतोच, राजकीय राड्यानंतर कृषीमंत्र्यांचं स्पष्टीकरण, व्हायरल व्हिडिओवर कोकाटे काय म्हणाले?

Manikrao Kokate On Rohit Pawar X Post : रोहित पवार यांनी कृषीमंत्र्यांचा व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओत कृषीमंत्री सभागृहात रमी खेळत असल्याचा दावा पवार यांनी केला. या प्रकरणावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Manikrao Kokate On Rohit Pawar Over
Manikrao Kokate On Rohit Pawar Overx
Published On

तबरेज शेख, साम टीव्ही, प्रतिनिधी

Maharashtra Political News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडीओ एक्सवर पोस्ट केला. या पोस्टद्वारे रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे सभागृहात जंगली रमी खेळत असल्याचे म्हटले आहे. या रमी प्रकरणाची थोड्याच वेळात राजकीय वर्तुळावर चर्चा पाहायला मिळाली. शरद पवार गटाच्या इतर नेत्यांनीही कोकाटे यांच्यावर निशाणा साधला. या एकूणच प्रकरणावर कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

'वरच्या हाऊसमधील काम संपल्यानंतर खालच्या हाऊसमध्ये काय सुरु आहे हे पाहण्यासाठी मी युट्यूब सुरु केले. तेव्हा जाहिरात आली, ती स्कीप करणार होतो, पण दोन-चार सेकंद जास्त वेळ लागला. व्हिडीओ पुढे दाखवला असता, तर मी युट्यूब पाहत होतो हे कळाले असते. माझ्या लक्षात आलं नाही, जाहिरात स्कीप कशी करायची ते मला माहीत नव्हते', असे वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केले आहे.

कृषीमंत्री म्हणाले, 'ज्याने माझा व्हिडीओ काढला असेल, त्याला काढू द्या.. खालच्या हाऊसमध्ये काय सुरु आहे ते पाहण्यासाठी मी फोन सुरु केला होता. जाहिरात आली आणि माझा व्हिडीओ काढण्यात आला. प्रत्येकाला जंगली रमीच्या जाहिराती येतात. रोहित पवारांच्या मोबाईलमध्येही जाहिराती येत असतील, कोणत्या गोष्टींचं भांडवल करावं, कोणत्या नाही हे रोहित पवारांना कळायला हवं. ते स्वत:ची करमणूक करुन घेत आहेत.'

Manikrao Kokate On Rohit Pawar Over
Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का बसणार? राज्यातील मोठा नेता सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत

'माझं काम पारदर्शनक आहे, माझा स्वभाव स्पष्ट आहे. हाऊसचे नियम मला माहीत आहेत. तिथे कॅमेरे चालू असतात. लोकांना बदनाम करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. विधानसभेत सुंदर काम झाले, विरोधी पक्षाला काहीही करता आले नाही, त्यांना कळून चुकलं आहे की आपलं सरकार येऊ शकत नाही. त्यामुळे ते सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांची बदनामी करत आहेत', असे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हटले आहेत.

Manikrao Kokate On Rohit Pawar Over
Politics : महिला आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, राजकारण सोडण्याचा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com