Shocking : मित्राकडे ३ मुलांना ठेवलं, आई-बाप चित्रपट पाहायला गेले, ६ तासांत २ वर्षांच्या चिमुकलीसोबत विचित्र घडलं

Thane 2 Year Old Girl Kidnapped Crime News : ठाण्यात दोन वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी जलद कारवाई करून मुलीची अंबरनाथ स्थानकातून २४ तासांत सुखरूप सुटका केली.
Shocking : मित्राकडे ३ मुलांना ठेवलं, आई-बाप चित्रपट पाहायला गेले, ६ तासांत २ वर्षांच्या चिमुकलीसोबत विचित्र घडलं
Thane Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • ठाण्यात २ वर्षीय मुलीचे अपहरण

  • ओळखीच्या व्यक्तीच्या मित्रानेच मुलीचे अपहरण केल्याचे समोर.

  • पोलिसांनी अंबरनाथहून २४ तासांच्या आत मुलीची सुटका केली

  • परिसरात खळबळ

ठाण्यासारख्या गजबजलेल्या शहरात दोन वर्षीय चिमुकलीचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चित्रपट बघण्यासाठी गेलेल्या पालकांनी आपली तीन मुलं ओळखीच्या व्यक्तीच्या हाती देखरेखीसाठी ठेवली. मात्र याच ओळखीच्या व्यक्तीच्या मित्राने ३ मुलांपैकी २ वर्षीय मुलीचे अपहरण केल्याचे समोर आले. याप्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी हैवानांच्या तावडीतून मुलीची तब्बल २४ तासांच्या आत अंबरनाथ स्थानकातून सुखरूप सुटका केली.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यात राहणारे एक जोडपं सोमवारी चित्रपट बघायला ठाण्यातील एका जवळच्या चित्रपटगृहात गेले होते. या जोडप्याला तीन मुलं आहेत. या तिन्ही मुलांना जवळच्या ओळखीतल्या एका व्यक्तीकडे सोडून हे जोडपं चित्रपट पाहण्यासाठी गेले. चित्रपट पाहून, फिरून, जेवण करून हे तिघेही ठाण्यात परतले.

Shocking : मित्राकडे ३ मुलांना ठेवलं, आई-बाप चित्रपट पाहायला गेले, ६ तासांत २ वर्षांच्या चिमुकलीसोबत विचित्र घडलं
Pune : भाविकांसाठी मोठी बातमी! पुण्यातील प्रसिद्ध गणपतीचे मंदिर पुढील काही दिवस राहणार बंद

परतल्यानंतर त्यांनी मुलांना सांभाळण्यासाठी दिलेल्या व्यक्तीला मुलांना त्यांच्याजवळ आणून सोडण्यासाठी सांगितले. मात्र त्या व्यक्तीने दिलेलं उत्तर ऐकून जोडप्याच्या काळजाचा ठोका चुकला. संबंधित व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे जोडप्याची दोन वर्षीय मुलगी बेपत्ता असून तिचं अपहरण करण्यात आलं आहे. त्याक्षणी जोडप्याने मुलीच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली.

Shocking : मित्राकडे ३ मुलांना ठेवलं, आई-बाप चित्रपट पाहायला गेले, ६ तासांत २ वर्षांच्या चिमुकलीसोबत विचित्र घडलं
Today Weather : राज्यात पुढील काही दिवस थंडी कायम! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, जाणून घ्या IMDचा इशारा

चिमुकलीच्या पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अपहरण करणाऱ्याचा शोध घेत पोलीस अंबरनाथ येथे पोहचले. आणि तिथेच अपहरणकर्त्याच्या मुसक्या आवळल्या. शिवाय पोलिसांनी चिमुकलीला सुखरूपरित्या नराधमाच्या हातून सोडवलं. धक्कादायक म्हणजे अपहरणकर्ता हा जोडप्याने सांभाळायला दिलेल्या ओळखीच्या व्यक्तीचा मित्र असल्याचे समोर आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com