तळोजामध्ये भंगार गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाचे ६ अग्निबंब घटनास्थळी
Taloja factory fire Saam tv

Taloja Godown Fire: तळोजामध्ये भंगार गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळी, Video

Taloja Godown fire Update: रायगडच्या पनवेल तालुक्यातील तळोजामध्ये भंगार गोदामाला भीषण आग लागली आहे. आग लागल्याची माहिती मिळताचत अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं आहे.
Published on

सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही प्रतिनिधी

पनवेल : पनवेलमधील तळोजातून आगीचं वृत्त हाती आलं आहे. तळोजामध्ये भंगार गोदामाला भीषण आग लागली आहे. आग लागल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं आहे. या आगीच्या घटनेमुळे गोदाम परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलच्या तळोजा येथील रोहिंजण टोल नाक्याजवळ भंगार गोदामाला भीषण आग लागली. गोदामाला भीषण आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत.

तळोजामध्ये भंगार गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाचे ६ अग्निबंब घटनास्थळी
Nagpur Accident News: नागपुरात पुन्हा एकदा हिट अँड रन; भरधाव ट्रकने १७ वर्षीय मुलाला चिरडलं, पाहा VIDEO

अग्निशमन दलाचे ५ ते ६ बंब घटनास्थळी पोहोचले आहेत. गोदामाला लागलेली आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या भीषण आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.

तळोजामध्ये भंगार गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाचे ६ अग्निबंब घटनास्थळी
Pune Maval Firing CCTV : पुण्यात चाललंय काय? तळेगावात हवेत 5 राऊंड फायर; घटनेचा थरारक VIDEO व्हायरल

सोलापुरात फटाक्याच्या कारखान्याला आग

सोलापुरातील बार्शी तालुक्यातील घारी गावात फटाक्याच्या कारखान्याला भीषण आग लागली. कारखान्याला आग लागून झालेल्या स्फोटाचा परिसराला हादरा बसला. युन्नूस मुलाणी यांच्या मालकीच्या कारखान्याला ही आग लागली.

या कारखान्यात १५ महिला मजूर काम करतात. आज वटपौर्णिमेनिमित्त सुट्टी असल्याने कोणत्याही महिला कामाला गेल्या नव्हता. त्यामुळे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या स्फोटाचा कारखाना मालकाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

या आगीच्या घटनेची माहिती मिळताच पांगरी पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी पुढील कारवाई सुरु केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com