Pune Maval Firing CCTV : पुण्यात चाललंय काय? तळेगावात हवेत 5 राऊंड फायर; घटनेचा थरारक VIDEO व्हायरल

Pune Maval Firing News : पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील तळेगावात हवेत 5 राऊंड फायर झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने तळेगावात एकच खळबळ उडाली आहे.
Pune Maval Firing
Pune Maval Firing Saam tv
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळच्या तळेगाव दाभाडे शहरात रात्री शहरात गोळीार झाल्याची घटना घडली आहे. अज्ञात दुचाकीस्वारांनी एकूण चार ठिकाणी हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या अज्ञात दुचाकीस्वारांनी ५ राऊंड फायर केल्याची माहिती मिळत आहे. ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे

पुण्यातील मावळमध्ये गुरुवारी रात्री गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. तळेगाव दाभाडे शहरात रात्री दहशत माजवण्यासाठी हवेत गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे. मावळमधील ही गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या अज्ञात दुचाकीस्वारांनी चार ठिकाणी ५ रांऊंड फायर केल्याची माहिती मिळत आहे.

Pune Maval Firing
Palghar Crime News: चाललंय काय? वसईनंतर विरार हादरलं! जावयाने धारदार शस्त्राने केली सासूची हत्या

नेमकं काय घडलं?

मावळमधील तळेगाव दाभाडे शहरात अज्ञात दुचाकीस्वारांनी रात्री हवेत गोळीबार केला. तळेगाव दाभाडे शहरात सहा जणांचे टोळके दोन दुचाकींवरून हातात पिस्तूल घेऊन चेहऱ्याला मास्क लावून फिरत होते. गुरुवारी रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास या टोळक्यांनी चार ठिकाणी गोळीबार केला.

Pune Maval Firing
Ahmednagar Crime: जन्मदात्या आईचे सैतानी कृत्य! प्रेमात अडसर ठरणाऱ्या मुलांनाच संपवलं; प्रियकराच्या मदतीने शेततळ्यात बुडवून घेतला जीव

या टोळक्यांनी शाळा चौक, राजेंद्र चौक, मारुती चौक, गजानन महाराज मंदिराजवळ अशा ४ ठिकाणी गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे. या अज्ञात दुचाकीस्वारांनी शाळा चौक येथे आरोपींनी दोन गोळ्या झाडल्या. तर तीन ठिकाणी प्रत्येकी एक गोळी झाडल्याची माहिती मिळत आहे.

या गोळीबाराची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके तळेगाव दाभाडे शहरात पोहोचले. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्याचं काम सध्या सुरु आहे. दरम्यान, पुण्यात मागील काही महिन्यांत गोळीबाराच्या घटनेत वाढ होऊ लागली आहे. या वाढत्या गोळीबाराच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com