Nagpur Accident News: नागपुरात पुन्हा एकदा हिट अँड रन; भरधाव ट्रकने १७ वर्षीय मुलाला चिरडलं, पाहा VIDEO

Nagpur hit and run case : नागपुरात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. सुसाट वेगात असलेल्या ट्रकने एका अल्पवयीन मुलाला चिरडलं आहे. यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
नागपुरात पुन्हा एकदा हिट अँड रन; भरधाव ट्रकने १७ वर्षीय मुलाला चिरडलं, पाहा VIDEO
Nagpur hit and run caseSaam TV

पराग ढोबळे, साम टीव्ही नागपूर

नागपूर शहरात हिट अँड रनच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीय. अगदी दोन दिवसांपूर्वी शहरातील दिघोरी नाक्याजवळ एका भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या ९ मजुरांना चिरडलं होतं. ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. सुसाट वेगात असलेल्या ट्रकने एका अल्पवयीन मुलाला चिरडलं आहे. यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

अश्विन आठवले (वय १७) असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. काटोल रोडवरील गोरेवाडा झू परिसरात गुरुवारी (ता. २०) रात्री उशीरा ही घटना घडली आहे. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

आठवडाभरातील हिट अँड रनची ही तिसरी घटना आहे. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, मृत अश्विन हा दुचाकीवरून जात होता. गोरेवाडा झू परिसरात एका भरधाव ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की आश्विनचा जागीच मृत्यू झाला.

नागपुरात पुन्हा एकदा हिट अँड रन; भरधाव ट्रकने १७ वर्षीय मुलाला चिरडलं, पाहा VIDEO
Nagpur Hit And Run Case: नागूपर हिट अँड रन प्रकरणातील मृतांचा आकडा वाढला, ४ वर्षांच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू

अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांना येत असल्याचं पाहून ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळ गाठत आश्विनचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दरम्यान, फुटपाथवर झोपलेल्या मजुरांना कारने चिरडलं होतं. आता याप्रकरणातील मृतांचा आकडा वाढला आहे. उपचारादरम्यान ४ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या अपघात प्रकरणातील मृतांचा आखडा ३ वर गेला आहे. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला होता.

नागपुरात पुन्हा एकदा हिट अँड रन; भरधाव ट्रकने १७ वर्षीय मुलाला चिरडलं, पाहा VIDEO
Sambhajinagar News : मोकाट कुत्र्यांचा तरुणीवर जीवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com