घरातली लोक झोपलेली, दाराची कडी लावली अन् स्मार्ट मीटर बसवून गेले; महावितरणचा गजब कारभार

Smart Meter Installation Controversy In Thane Maharashtra: ठाण्यात स्मार्ट मीटर बसवताना महावितरण कर्मचाऱ्यांनी रहिवाशांच्या घरांना बाहेरून कडी लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घोडबंदर परिसरात वीजपुरवठा खंडित करून स्मार्ट मीटर बसवण्याचा आरोप होत असून नागरिकांमध्ये संताप वाढला आहे.
Smart meter installation sparks outrage in Thane after residents allege forced entry and power cuts by authorities.
Smart meter installation sparks outrage in Thane after residents allege forced entry and power cuts by authorities.saam tv
Published On

विकास काटे, साम टीव्ही

ठाणे: स्मार्ट मीटर लावण्यावरून राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत असताना ठाण्यात अजब प्रकार घडला आहे. महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ठाण्याच्या सावरकरनगरमध्ये दुपारी रहिवाशी झोपले असताना घराची बाहेरून कडी लावून लपून स्मार्ट मीटर लावण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तर स्मार्ट मिटर लावण्यासाठी घोडबंदरवरील एका संकुलातील सहा इमारतीचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटर केवळ व्यापारी संकुल, आस्थापना यांना लावला जाईल सामान्य ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविले जाणार नाही असे विधिमंडळाच्या अधिवेशनात आश्वासन देऊन विरोधकांना धारेवर धरले होते. तेच मुख्यमंत्री फडणवीस आता स्मार्ट मीटर अनिवार्य आहे असे सांगू लागल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

Smart meter installation sparks outrage in Thane after residents allege forced entry and power cuts by authorities.
Rain Alert : राज्यात २१ जुलैनंतर जोरदार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय? वाचा

स्मार्ट मीटरमुळे वाढीव बिल येत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे स्मार्ट मीटरला तीव्र विरोध होऊ लागला आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने अदानी कंपनीचे हे खासगी मीटर ग्राहकांच्या माथी मारण्यासाठी नवीन परिपत्रक काढून दबाव टाकत आहे. ज्या गृहनिर्माण संकुलात स्मार्ट मीटर लावले जात नाही त्याचा वीज पुरवठा खंडित करण्याचा अन्यायकारक प्रकार करीत आहे. घोडबंदर रोडवरील विहंग गृहसंकुलातील तब्बल ६ इमारतीचा वीज पुरवठा खंडित करण्याचा प्रकार महावितरण कंपनीने केला आणि स्मार्ट मीटर लावण्यासाठी जुलूम करण्यास सुरुवात केली आहे. जबरदस्तीने स्मार्ट मीटर लावण्याची मोहीम राबविली जात असून त्यासाठी लोकांच्या घरांना कडी लावून मिटर बदलले जात आहे.

Smart meter installation sparks outrage in Thane after residents allege forced entry and power cuts by authorities.
Mumbai Metro: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! घाटकोपर- वर्सोवा प्रवास होणार गर्दीमुक्त; काय आहे मेट्रोचा प्लान?

स्वा.सावरकर नगरमधील डेनिस कंपाऊंडमध्ये आज (डेनिस चाळीत) रहिवाशी दुपारच्या वेळेस झोपेत असताना चक्क दरवाजा बंद असताना त्या दरवाजाला बाहेरून कडी लावून जुने मिटर काढून - नवीन स्मार्ट मिटर लावल्याचा प्रकार घडला. सायंकाळी हा प्रकार लक्षात आला आहे. परिसरात २४ तास लाईट जाते त्यावेळी अनुभवी कर्मचाऱ्यांची कमतरता, मेंटेनन्स नाही अशी कारणे सांगितली जातात. आता दुपारच्यावेळी राहिवाशांच्या दरवाजाला कड्या लावून जुने मिटर पळवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्मार्ट मिटर लावून पळून जाणे आणि नंतर जुने मिटर ब्रेक करून टाकत असल्याचा आरोप ग्राहक करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com