Mumbai Metro: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! घाटकोपर- वर्सोवा प्रवास होणार गर्दीमुक्त; काय आहे मेट्रोचा प्लान?

Ghatkopar- Andheri- Varsova Metro Line 1: घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मार्गिकेवर मेट्रो १ मध्ये अतिरिक्त डब्बे जोडले जाणार आहेत.
Ghatkopar- Andheri- Varsova Metro Line 1
Ghatkopar- Andheri- Varsova Metro Line 1meta ai
Published On
  • मुंबईकरांसाठी गुड न्यूज

  • मेट्रो प्रवास होणआर गर्दीमुक्त

  • घाटकोपर- वर्सोवा मार्गावरील मेट्रोच्या डब्यात होणार वाढ

  • नवी मेट्रो वापरात आणणार,

  • पाच लाख प्रवास होणार सुखकर

मुंबईची सगळ्यात पाहिली मेट्रो मार्गिका म्हणून ओळख असलेली घाटकोपर - अंधेरी - वर्सोवाची मार्गिका आहे. याच मार्गिकेवर धावणाऱ्या मेट्रो -१ चा लवकरच विस्तार होणार आहे. यामुळे मेट्रो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबईतील पहिली आणि अत्यंत महत्त्वाची असणारी अशी ही मार्गिका आहे सध्याच्या वेळेला या मेट्रोतून एका दिवसाला साधारण ५ लाख मुंबईकर प्रवास करत आहेत. मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता येत्या काळात मेट्रोवरील हा ताण आणखी वाढण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर (एमएमओपीएल ) घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा मेट्रो मार्गिका अतिरिक्त डब्बा खरेदी करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी लवकरच निविदा मागवल्या जाणार आहेत.

Ghatkopar- Andheri- Varsova Metro Line 1
Mumbai Metro Line-4: मेट्रोच्या कामामुळे LBS रोड 30 सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद; कोणते असतील पर्यायी मार्ग?
Ghatkopar- Andheri- Varsova Metro Line 1
Jayant Patil: मुख्यमंत्री फडणवीसांची भेट का घेतली? जयंत पाटील यांनी सर्वकाही सांगितलं

एसी लोकल, लोकल यांच्या संख्येत किंवा डब्ब्यात जरी वाढ केली असली. तरी मेट्रो स्थानकात सकाळी आणि संध्याकाळी चाकरमान्यांची तुडुंब गर्दी असते, त्यामुळे मेट्रो सेवा अपुऱ्या पडत आहेत. त्यानुसार चार डब्ब्यांच्या लोकल ऐवजी ६ डब्ब्यांची लोकल चालवण्याचा निर्णय एमएमओपीएलने घेतला आहे.

या निर्णयानुसार, ३२ अतिरीक्त डब्बे खरेदी केले जाणार आहे. त्यासाठी नॅशनल अॅसेट रिकन्ट्रक्शन कंपनी लिमिटेडशी २,७७१.३२ कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे.मात्र आर्थिक अडचणींमुळे निधी उपलब्ध होत नसल्याने खरेदीचा प्रस्ताव रखडला आहे म्हणून राज्य सरकारकडून निधी लवकरात लवकर मिळावा यासाठी एमएमओपीएलचे प्रयत्न सुरू राहणार आहेत.

Ghatkopar- Andheri- Varsova Metro Line 1
Mumbai Metro 4: वडाळा-कासारवडवली मेट्रोच्या कारशेडचा मार्ग मोकळा; अंतर, स्टेशन संख्या, Route काय? जाणून घ्या संपूर्ण प्रकल्पाची माहिती

६ डब्बे आणि १७ ची मेट्रोसंख्या

४ डब्ब्यांची मेट्रो ६ डब्ब्यांची होणार आहे. तर या मार्गावरील मेट्रो संख्या १६ वरून १७ करण्यात येणार आहे. म्हणजेच घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा मेट्रो १ मध्ये २ डब्बे जोडले जाणार असून एनओपीएल एक ६ डब्ब्यांची मेट्रो देखील खरेदी केली जाणार आहे.

Ghatkopar- Andheri- Varsova Metro Line 1
Pune Metro: पुणेकरांसाठी गुड न्यूज! कल्याणीनगर ते पुणे एअरपोर्ट मेट्रो धावणार, वाहतूक कोंडी फुटणार; किती स्थानके असणार?
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com