Mumbai Metro Line-4: मेट्रोच्या कामामुळे LBS रोड 30 सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद; कोणते असतील पर्यायी मार्ग?

Mumbai Metro Line-4: मुंबई वाहतूक पोलिसांनी मुलुंड आणि भांडुपमधील सोनापूर जंक्शनजवळ वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. मेट्रोच्या कामासाठी हे बदल करण्यात आली आहेत.
Mumbai Metro Line-4:
MUMBAI TRAFFIC UPDATE: SONAPUR JUNCTION DIVERSION, ALTERNATE ROUTES ANNOUNCED FOR MULUND-BHANDUP COMMUTERSsaam tv
Published On
Summary
  • सोनापूर जंक्शन परिसरातील वाहतूक वळवण्याचा निर्णय

  • मुलुंड, कांजूरमार्ग आणि भांडुपकडे जाणाऱ्या वाहनांसाठी नवीन पर्यायी मार्ग जाहीर

  • सोनापूर जंक्शन, मुलुंड, कांजूरमार्ग आणि भांडुपकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहतूक वळवण्यात आली आहे

मुंबई मेट्रो लाईन-4 वडाळा-ठाणे अंतर्गत शांग्रीला मेट्रो स्टेशनच्या बांधकाम काम करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी भांडुपमधील लाल बहादूर शास्त्री एलबीएस रोडवर रात्रीसाठी वाहतुकीत मोठा बदल केला आहे. पूर्व उपनगर विभागाचे पोलीस उपआयुक्त वाहतूक विभाग प्रदीप चव्हाण यांनी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार भांडुप पोलीस ठाण्याजवळील डॉ. कल्पना चावला चौक आणि भांडुप पश्चिममधील सोनापूर जंक्शन दरम्यानचा रस्ता ६ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद असणार आहे.

Mumbai Metro Line-4:
Best Bus Accident : पुन्हा बेस्ट बसचा अपघात, २ जणांना चिरडले, व्हिडिओ समोर आला

गर्डर बांधकामाचे काम पूर्ण होईपर्यंत या मार्गावरील दोन्ही दिशांकडून होणारी सर्व अनावश्यक वाहतूक बंद राहणार आहे. मुलुंड वाहतूक विभागाकडून जारी केलेल्या निर्देशांनुसार, हे निर्बंध दररोज रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत लागू राहणार आहे. आपत्कालीन वाहनांना या बंदमधून सूट देण्यात येईल. मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या U, T, आणि L-आकाराच्या प्रीकास्ट गर्डर्सची स्थापना करणे. क्रेन व मल्टी-ॲक्सल ट्रेलरसह अवजड यंत्रसामग्रीच्या वाहतुकीची सोय सुरळीत करता यावी यासाठी वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आलेत.

Mumbai Metro Line-4:
मोठी बातमी! विधान भवन, पुण्यातील महापौर कार्यालय आणि RSS कार्यालय बॉम्बनं उडवण्याची धमकी

वाहतुकीसाठी मार्ग बंद असल्यानं पर्यायी मार्ग कोणते?

कांजूर मार्ग आणि भांडुपकडून मुलुंड आणि ठाण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीला भांडुप व्हिलेज रोड, बाळकृष्ण तातोजीराव शिंदे चौक आणि सुभाष नगर रोडमार्गे वळवण्यात येणार आहे. त्यानंतर ही वाहने सोनापूर जंक्शन आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या दिशेने गोरेगाव-मुलुंड लिंक रोडला (जीएमएलआर) जोडली जातील. यासह हलक्या मोटार वाहनांना मारुती मंदिर रोड, लेक रोड, स्वतंत्र सैनिक नाथा बाबाजी थोरात रोड आणि श्री कायकाई शेट्टी मार्गाने अतिरिक्त मार्ग असणार आहे.

याचप्रमाणे सोनापूर जंक्शन आणि मुलुंडहून कांजूरमार्ग आणि भांडुपच्या दिशेने जाणारी वाहतूक सुभाष नगर रोड, बाळकृष्ण तातोजीराव शिंदे चौक आणि भांडुप व्हिलेज रोडमार्गे डॉ. कल्पना चावला चौकात जाण्यासाठी वळवण्यात येईल. हलकी वाहनेही श्री कायकाई शेट्टी मार्ग, स्वतंत्र सैनिक नाथा बाबाजी थोरात रोड आणि लेक रोड मार्गे पर्यायी मार्ग वापरू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com