

पुण्यातील महापौर कार्यालय, विधान भवन आणि नागपूरमधील आरएसएस कार्यालयाला बॉम्बची धमकी
धमकीनंतर महापौर कार्यालयातील कर्मचाऱ्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले
पोलीस, बॉम्ब शोधक पथक आणि सायबर यंत्रणा तपासात गुंतल्या आहेत.
पुण्यातील महापौर कार्यालय, विधान भवन आणि नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. एका ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. महापौर कार्यालयाला हा धमकीचा ईमेल आल्यानंतर महापालिकेतील कर्मचाऱ्यांना कार्यालयातून बाहेर काढण्यात आले आहे.(Bomb Threat To Vidhan Bhavan, Pune Mayor Office And Rss Office; Security Agencies On High Alert)
हाती आलेल्या माहितीनुसार खलिस्तान नॅशनल आर्मीकडून हा धमकीचा ईमेल पाठवण्यात आला आहे. खलिस्तान नॅशनल आर्मीकडून धमकीच्या मेलमध्ये ऑपरेशन ब्लू स्टारचा उल्लेख करण्यात आला आहे. ऑपरेशन ब्लू स्टारचा बदला घेण्यासाठी तीन ठिकाणी बॉम्ब हल्ला केला जाणार असल्याचा मेल संबंधित कार्यालयांना मिळाला आहे.
पुण्यातील महापौर कार्यालयासह, नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि विधान भवन या तिन्ही मुख्य कार्यालयांना धमकी देण्यात आली आहे. आरएसएसने ऑपरेशन ब्लू स्टारला पाठिंबा दिला होता याचा बदला घेण्यासाठी हे कृत्य करणार असल्याचं धमकीच्या मेल मध्ये म्हटलंय.सकाळी 8 वाजून 20 मिनिटांनी महापौर कार्यालयाला मेल प्राप्त झाला होता. धमकीचा मेल आल्यानंतर पोलीस, बॉम्ब शोधक पथक आणि सायबर यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. महापालिकेतील कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.