Fact Check: पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर खरंच वीज पुरवठा खंडित होणार का? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Cyber Attack or Fake News?: पाकिस्तानने भारतावर सायबर हल्ला केला. त्यामुळे भारतातील वीज पुरवठा खंडित होणार आहे, अशाप्रकारचे मेसेज सध्या व्हायरल होत आहे. या मेसेजमागचं सत्य काय आहे हे घ्या जाणून....
Fact Check: पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर खरंच वीज पुरवठा खंडित होणार का? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?
Cyber Attack or Fake NewsSaam Tv
Published On

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवला. ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारताने मोठी कारवाई करत ९ दहशतवादी तळ नष्ट केले. ऑपरेशन सिंदूरनंतर संतापलेला पाकिस्तान भारतावर सतत हल्ले करत आहे. यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तान सतत भारतातील अनेक ठिकाणी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करत आहे. पण पाकिस्तानचे सर्व नापाक प्रयत्न भारतीय सैन्य उधळवून लावत आहेत.

दोन्ही देशातील तणावाच्या वातावरणात सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. पाकिस्तानकडून सोशल मीडियावर भारताशी संबंधित अनेक बनावट माहिती पसरवली जात आहे. पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा खंडित होणार असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये काहीच तथ्य नाही. कारण 'पीआयबी फॅक्ट चेक'द्वारे हा मेसेज फेक असल्याचे सांगण्यात आले आहे.

सोशल मीडियावर नुकताच व्हायरल होत असलेल्या एका मेसेजमधील दाव्याचे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो अर्थात पीआयबीने खंडन केले आहे. पीआयबीने अशा अफवांपासून दूर राहण्याचे आणि त्यावर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले आहे. व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने सायबर हल्ल्याद्वारे भारताच्या ७० टक्के पॉवर ग्रिडला निष्क्रिय केले आहे. ही पोस्ट ग्लोबल डिफेन्स इनसाईट आणि डॉ. कमर चीमा नावाच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे.

Fact Check: पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर खरंच वीज पुरवठा खंडित होणार का? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?
India Vs Pakistan: पाकिस्तानचा मध्यरात्री भ्याड हल्ला, ड्रोनने 26 ठिकाणं टार्गेट, घरांच्या भिंती पडल्या, वाहनांच्या काचा फुटल्या | VIDEO

या व्हायरल पोस्टमध्ये लिहिले होते की, पाकिस्तानी सैन्याच्या मते सायबर हल्ल्यामुळे भारताचा ७० टक्के पॉवर ग्रिड उद्ध्वस्त झाले आहे. 'पीआयबी फॅक्ट चेक'ने हा दावा पूर्णपणे खोटा आणि बनावट असल्याचे सांगितले आहे. पीआयबीने 'एक्स' अकाऊंटवर यासंदर्भात पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी असे लिहिले की, 'सायबर हल्ल्याद्वारे पाकिस्तानने भारताच्या ७० टक्के पॉवर ग्रिडला निष्क्रिय केल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे.' पीआयबीने जनतेला कोणत्याही प्रकारच्या माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. फक्त अधिकृत स्रोतांकडूनच मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवा असे त्यांनी सांगितले आहे.

Fact Check: पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर खरंच वीज पुरवठा खंडित होणार का? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?
India Pakistan War: काय आहे पाकिस्तानची फतेह-1 मिसाईल? जाणून घ्या, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com