Maharashtra Politics: भास्कर जाधवांचा सूचक WhatsApp स्टेटस, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Bhaskar Jadhav Whatsapp Status: शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांच्याशी झालेल्या वादादरम्यान भास्कर जाधव यांनी केलेल्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Maharashtra Politics: भास्कर जाधवांचा सूचक WhatsApp स्टेटस, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Bhaskar JadhavSaam tv
Published On
  • भास्कर जाधव यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसने राजकीय चर्चा रंगली

  • स्टेटसचा संबंध मिलिंद नार्वेकर यांच्याशी झालेल्या वादाशी जोडला जातोय

  • पोस्टमध्ये थेट कोणाचाही उल्लेख नाही

  • ठाकरे गटात अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चांना उधाण

गिरीश कांबळे, मुंबई

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी सोशल मीडियावर एक सूचक स्टेटस शेअर केल्याने पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सचिव आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यासोबतच्या अलीकडील शाब्दिक वादानंतर भास्कर जाधव यांनी ठेवलेल्या या व्हॉट्सअप स्टेटसमुळे विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.

भास्कर जाधव यांनी स्टेटसमध्ये लिहिले आहे, “चापलूसों की जमात में सीधे खड़े आदमी पर भी, अकड़ने की तोहमत लग जाती है.” या पोस्टचा अर्थ असा घेतला जात आहे की, चापलूस लोकांच्या गर्दीत जो माणूस सरळ, स्वाभिमानाने आणि तत्त्वांवर उभा राहतो, त्यालाही ‘घमेंडी’ किंवा असल्याचा आरोप सहन करावा लागतो.

Maharashtra Politics: भास्कर जाधवांचा सूचक WhatsApp स्टेटस, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Maharashtra Politics: शरद पवार अन् काँग्रेसला मोठा धक्का; 15 बडे नेते शिंदेसेनेत प्रवेश करणार; राज्यात टायगर एक्स्प्रेस सुसाट

भास्कर जाधव यांच्या या व्हॉट्सअप स्टेटसचा रोख नेमका कोणाकडे आहे याबाबत त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र, पक्षातील अलीकडील घडामोडी आणि मिलिंद नार्वेकर यांच्याशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर या पोस्टकडे राजकीय संदेश म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे भास्कर जाधव काही निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत की काय अशी देखील चर्चा काही केली जात आहे.

Maharashtra Politics: भास्कर जाधवांचा सूचक WhatsApp स्टेटस, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Maharashtra Politics: 'ऑपरेशन टायगर' सोपं नाही, खासदाराचं तळ्यात-मळ्यात; एकनाथ शिंदेंचा डाव फसणार? वाचा Inside Story

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी मिलिंद नार्वेकर यांनी भास्कर जाधव यांच्यावर टीका करत विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्याने ते “फ्रस्ट्रेट” झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर भास्कर जाधव यांचा हा सूचक व्हॉट्सअप स्टेटस चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, या पोस्टमध्ये कोणाचाही थेट उल्लेख नसल्याने ती नेमकी कोणाला उद्देशून आहे, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.

Maharashtra Politics: भास्कर जाधवांचा सूचक WhatsApp स्टेटस, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Maharashtra Politics: खासदारांनंतर आमदारही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? 3 आमदारांची बैठकीला दांडी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com