Why Bhaskar Jadhav is opposing the 10% rule for Opposition Leader post : विरोधी पक्षनेतेपदावरुन ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय. 10 टक्के सदस्य संख्येची उल्लेख कुठेही नाही असं भास्कर जाधवांनी म्हटलंय. आधी विरोधी पक्षनेता निवडीची घोषणा करा असंही त्यांनी म्हटलंय.
राज्यातील विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीवरून ठाकरे गटाच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'रात्री डोळ्याला गॉगल लावून, वेष बदलून सरकार कसं पाडलं, हे मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं आहे', असा टोला त्यांनी लगावला. विरोधी पक्षनेतेपदासाठी दहा टक्के सदस्यसंख्येची अट नसल्याचा दावा करत, त्यांनी विधीमंडळ सचिवांच्या पत्राचा हवाला दिला. तसेच, शक्ती विधेयक केंद्राने नाकारल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं सांगत, त्यांनी महिला सुरक्षेवरून सरकारला धारेवर धरलं. हिवाळी अधिवेशन केवळ पुरवणी मागण्यांसाठी असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.