
दिलीप कांबळे, साम टीव्ही
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज हभप शिरीष महाराज मोरे यांनी आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. ते रात्री जेवण केल्यानंतर झोपायला गेले. मात्र सकाळी खोलीचं दार उघडले नाही. त्यामुळे दार तोडल्यानंतर त्यांनी घरात गळफास घेतल्याचं समोर आलं. शिरीष महाराज मोरे यांनी आर्थिक विवंचनेतून पाऊल उचलल्याचं कारण आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केलंय. शिरीष महाराजांनी आत्महत्या करण्यापूर्वी चार चिठ्ठ्या लिहिल्या होत्या. होणाऱ्या बायकोला देखील शिरीष महाजारांनी चिठ्ठी लिहिली होती.
शिरीष महाराजांचा वीस दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. त्यांचा एप्रिल महिन्यात विवाह होणार होता. ते प्रसिद्ध प्रवचन आणि कीर्तनकार आहेत. तसेच शिवव्याख्याते देखील होते. मोरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आई,वडील, बहीण आणि होणाऱ्या बायकोला चिठ्ठी लिहिली होती. त्यांच्या आत्महत्येने मोरे कुटुंबियांसह संपूर्ण देहू गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
संत तुकाराम महाराज यांच्या देहूतील शिरीष महाराज मोरे यांनी अचानक टोकाचे पाऊल का उचलले, याचं कारण महाराजांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्यांमध्ये दडलं आहे. पहिल्या चिठ्ठीतून आई, वडील आणि बहिणीला संदेश लिहिला. तर दुसऱ्या चिठ्ठीतून होणाऱ्या पत्नीला संदेश लिहिला. त्यानंतर तिसऱ्या चिठ्ठीतून कुटुंबाला आणि चौथ्या चिठ्ठीतून मित्रांना शेवटचा संदेश दिला आहे. या चिठ्ठ्यांमधून आत्महत्येमागचं कारण समोर आलं आहे.
'माझ्यावर कर्जाचं डोंगर असून मी कोणाकडून किती कर्ज घेतलं, याची कल्पना माझ्या बाबांना आहे. तरी देखील मी त्यांची नावं आणि रक्कम चिठ्ठीत नमूद करत आहे. एकूण 32 लाखांचे कर्ज आहे. त्यापैकी कार विकून 7 लाख फिटतील. 25 लाखांचं कर्ज फेडण्यासाठी माझ्या कुटुंबाला साथ द्या, अशी विनंती महाराजांनी मित्रांना केली.
'मला वाटत होतं, मी हे कर्ज फेडू शकतो. परंतु आता लढण्याची ताकद माझ्यात उरली नाही, म्हणून हे टोकाचं पाऊल उचलत आहे, असं त्यांनी चिठ्ठीत म्हटलं आहे. इतर चिठ्ठ्यांमध्ये आई, वडील, बहीण आणि होणाऱ्या पत्नीचीही महाराजांनी माफी मागितली. होणाऱ्या पत्नीला अनेक स्वप्न दाखवली होती, पण ती पूर्ण न करता मी निघालो आहे. पण माझी सखे तू कुठं थांबू नकोस, तुझं आयुष्य जग, असंही त्यांनी चिठ्ठीत नमूद केलेलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.