Sant Tukaram Maharaj Palkhi : चला जाऊ पंढरी..संता महंता होतील भेटी!; जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान

Ashadhi Wari 2024 : आषाढी वारीसाठी आज जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराजांची पालख्यांचं पंढरपूरच्या दिशेने प्रस्तान झालं. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला मुक्काम आज देहूमध्ये असलेल्या इनामदार वाड्यात आहे.
Sant Tukaram Maharaj Palkhi
Sant Tukaram Maharaj PalkhiSaam Digital
Published On

चला पंढरीसी जाऊ| रखमादेवीवरा पाहू||

डोळे निवतील कान| मना तेथे समाधान||

संता महंता होतील भेटी| आनंदेनाचों वाळवंटी||

ते तीर्थांचे माहेर| सर्व सुखांचे भांडार||

जन्म नाही रे आणीक| तुका म्हणे माझी भाक||

आषाढी वारी आली की संपूर्ण महाराष्ट्राला वेध लागतात ते पंढरपुरच्या विठुरायाचे. टाळ-मृदुगांच्या तालावर वारकऱ्यांचे पाय पंढरपूरच्या दिशेने चालू लागतात ते आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी. जवळपास १५ ते २० दिवस तहान भूक विसरून वारकरी दिंडी आणि पालख्यांमध्ये दंग असतात. दरम्यान आज जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराजांची पालख्यांचं पंढरपूरच्या दिशेने प्रस्तान झालं.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला आज सुरुवात झाली. पालखीचे यंदा ३३९ वे वर्ष आहे. पालखीचा पहिला मुक्काम आज देहूमध्ये असलेल्या इनामदार वाड्यात आहे. देऊळवाडा व संत तुकोबारायांचे घर या दोन्हींच्यामध्ये इनामदार वाडा आहे. आषाढी वारीसाठी तुकोबारायांची पालखी मार्गस्थ झाल्यानंतर पहिला मुक्काम या वाड्यात असतो. म्हणून या वाड्याला महत्त्व आहे.

राज्यातील मानाच्या सात पालख्यांपैकी पैठणाची तिसऱ्या क्रमांकाची असलेली संत एकनाथ महाराजांची पालखी थोड्याच वेळात नाथवाड्यातील मंदिरातून समाधी मंदिराकडे प्रस्थान करणार आहे. त्यानंतर दिवसभर समाधी मंदिरात पालखीच विसावा राहणार असून महाप्रसादानंतर संध्याकाळी पालखी ही पालखी ओठ्यावर ठेवण्यात येईल आणि त्यानंतर पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. आजचा पहिला मुक्काम चनकवाडी या ठिकाणी राहणार आहे. पालखीत सहभागी होण्यासाठी राज्यभरातून हजारो वारकरी पैठ नगरीत दाखल झाले आहेत.

Sant Tukaram Maharaj Palkhi
Milk Anudan Yojana : दूध उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात मोठा दिलासा, मिळणार भरघोस अनुदान; जाणून घ्या सविस्तर माहिती

संत एकनाथ महाराजांची पालखी थोड्याच वेळात पंढरपूरकडे प्रस्थान झालं. तत्पूर्वी गोदावरी तीरावर प्रस्थान सोहळा रंगलेला होता. यंदा एकनाथ महाराजांच्या पालखीचे सोहळ्याचे 425 वर्ष आहे. मात्र अजूनही प्रवास खडतरच असल्याची खंत रघुनाथबुवा गोसावी आणि विश्वस्थ डॉ. गणेश मोहिते यांनी व्यक्त केली आहे. 19 दिवस पायी चालत जात असताना प्रवास खडतर असल्याने वारकऱ्यांना त्रास होतो याबद्दल सरकारने विचार करावा, अशी विनंती करण्यात आलीय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकरी सेवा रथाचं उद्घाटन केलं आज पासून हा सेवा रथ आळंदीच्या दिशेला रवाना होणार आहे. वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुदानाची घोषणा केली. मात्र या घोषणेवर उद्धव ठाकरे यांनी टीका करत अनुदानाची गरज नव्हती असं म्हटलं आहे . उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा खरबरी टीका करत उद्धव ठाकरे यांनी वारकऱ्यांचा अपमान केला असल्यास स्पष्ट केलंय. याशिवाय वारकऱ्यांचा नेहमीच मान शिवसेनेने ठेवला असून उद्धव ठाकरे यांना आता वारकऱ्यांची गरज नसल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय.

Sant Tukaram Maharaj Palkhi
Video : महिलांना १५००, तरुणांना १०००० रुपये; मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाची वैशिष्ट्येच मांडली

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com