Video : महिलांना १५००, तरुणांना १०००० रुपये; मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाची वैशिष्ट्येच मांडली

Maharashtra Budget 2024/CM Eknath Shinde : राज्यांच्या अंतरिम अर्थसंकल्पावरील विरोधकांच्या टीकेला उत्तर देत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत अर्थसंकल्पाची सर्व वैशिष्ट्ये मांडली
Video
VideoSaam Digital

अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात शेतकरी, महिला आणि तरुणांना दिलासा देणाचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र विरोधकांनी अर्थसंकल्प म्हणजे निवडणूक जुमला असल्याची टीका केली आहे. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढत अर्थसंकल्पाची सर्व मुद्दे पत्रकार परिषदेत मांडले. विरोधकांकडून खोटं बोला पण रेटून बोला, असंच खोटं नरेटिव्ह सेट करून त्यांनी लोकसभेत मते मिळवली, मिळवल्याचा टोला त्यांनी लगावला.

वारीतल्या मुख्य पालख्यांतील दिंड्यांना प्रतिदिंडी 20 हजार रुपये, ‘निर्मल वारी’साठी 36 कोटींचा निधी, 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा १५०० रुपये देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी ‘पिंक ई-रिक्षा’ योजना, राज्यातील 52 लाख कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना’, महिला लघुउद्योजकांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना’, सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे विरोधक गॅसवर आले आहेत.

आमचं सरकार आल्यानंतर सरकारी नोकऱ्यांवरील निर्बंध हटवले. १ लाख सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. खासगी कंपन्यांत स्कील डेव्हलपमेंट, स्टार्टअप आदींच्या माध्यमातून नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. आता जे सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्यांना १० हजार रुपये आणि अपरेंटिसशिपना नोकऱ्या दिल्या जातील. शेती पंपावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शेतीपंप वीज सवलत योजना सुरू केली. साडेसात एचपीपर्यंत वीज वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना बिल माफ करण्यात आलं आहे. जी आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्ण केली जातील. दिलेला शब्द पाळणारच. अर्थसंकल्पात पैशांची तरतूद करून या योजना तयार केल्या आहे. याची अंमलबजावणी केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

Video
Milk Anudan Yojana : दूध उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात मोठा दिलासा, मिळणार भरघोस अनुदान; जाणून घ्या सविस्तर माहिती

विरोधकांनी खोटं नरेटिव्ह सेट केलं

विरोधक म्हणातेयत अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय दिलं. आम्हाला जे द्यायचं होतं ते आम्ही दिलं. पण विरोधकांडून खोटं बोला पण रेटून बोला, असं सुरू आहे. खोटं नरेटिव्ह सेट करून त्यांनी लोकसभेत मते मिळवली. आता हे चालणार नाही. आता अर्थसंकल्प बघून चेहरे पडले आहेत. लोकसभेत विरोधकांना काही मिळवता आलं नाही, तरीही पेढे वाटत आहेत. हसायचं की रडायचं हेच कळत नाही, असा टोला इंडिया आघाडीला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

Video
Milk Anudan Yojana : दूध उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात मोठा दिलासा, मिळणार भरघोस अनुदान; जाणून घ्या सविस्तर माहिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com