Milk Anudan Yojana : दूध उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात मोठा दिलासा, मिळणार भरघोस अनुदान; जाणून घ्या सविस्तर माहिती

Maharashtra Budget 2024 : गेल्या सहा महिन्यांपासून गाईच्या दुधाच्या दरात कपात करण्यात आल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले होते. मात्र राज्याच्या अर्थसंकल्पात ५ रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
Milk Anudan Yojana
Milk Anudan YojanaSaam Digital

सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये गाईच्या दुधात प्रतिलिटर २५ रुपयांपर्यंत पडझड झाली होती. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. दूध दरात सरकारने हस्तक्षेप करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या होत्या. मात्र आज युती सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पात गाईच्या दुधावर प्रतिलिटर ५ रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. सरकारकडून १ जुलैपासून हे अनुदान दिलं जाणार आहे.

गायीच्या दुधाच्या दरात कपात करण्यात आल्यानंतर राज्यासह नगर जिल्ह्यात गाईच्या दूध दराचा प्रश्न गंभीर बनला होता. त्यामुळे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गाईच्या दुधावर प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान देण्याची योजना जाहीर केली होती. ही अनुदान योजना ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२४ या काळात शेतकऱ्यांनी दूध संघांना घातलेल्या दुधासाठी जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही दूध संघांकडून दुधाच्या दरात वाढ केली नव्हती.

आता विक्रेते, ग्राहक नाराज

दूध उत्पादक शेतकरी नाराज, जास्त दरामुळे ग्राहक नाराज तर कमिशन कमी मिळत असल्याने विक्रेते देखील नाराज आहेत. पिशवी बंद दुधाच्या विक्रीची पुण्यातील ही स्थिती आहे. पुण्यात म्हशीचे दूध ७२ रुपये प्रती लिटर दराने विकले जात आहे. गोकुळ, कात्रज, चितळे अशा पुण्यातील सर्व प्रमुख ब्रॅंडचा हा दर आहे. ⁠तर, गायीचे दूध ५६ रुपये प्रती लिटर दराने विकले जात आहे. ⁠दुधाचा हा दर जास्त असल्याचं सामान्य ग्राहकांचे म्हणणे आहे. तर, दर जास्त असले तरी, विक्रेत्यांना मिळणारे कमिशन अल्प/ कमी असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

Milk Anudan Yojana
VIDEO : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळालं? अर्थमंत्री अजित पवार यांची महत्वाची घोषणा, पाहा!

पुण्यात गाई आणि म्हशीच्या सुट्या / खुल्या दुधाचे दर देखील पॅकींग दुधाच्या दराबोरबरच आहेत.

सुट्या दुधाचे दर

१. जर्सी गायीचे दूध - ५४ रुपये लिटर

२. ⁠देशी गाईचे दूध - ७५ रुपये लिटर

३. ⁠म्हशीचे दूध - ६८ रुपये लिटर

सुटे दूध विक्री करणाऱ्या बहुतेक विक्रेते स्वतः दूध उत्पादक आहेत. तसेच ते शेतकऱ्यांकडून देखील दूध खरेदी करून विक्री करतात.

Milk Anudan Yojana
Maharashtra Budget 2024 Highlight: अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस! महिला, शेतकरी अन् युवकांना काय- काय मिळालं? वाचा बजेटमधील A To Z मुद्दे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com