Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; पैलवान चंद्रहार पाटील धनुष्यबाण हाती घेणार

uddhav thackeray News : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिलाय. पैलवान चंद्रहार पाटील आता शिंदेंचं धनुष्यबाण हाती घेणार आहे.
Eknath Shinde  news
Uddhav Thackeray And Eknath ShindeSaam Tv
Published On

सांगली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा दणका दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचा आणखी एक बडा नेता फोडला आहे. सांगलीतील पैलवान चंद्रहार पाटील शिंदे गटात प्रवेश करणार आहे. चंद्रहार पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारसोबत जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Eknath Shinde  news
Shashikant Chavan : माझ्या कुटुंबाचं बरं वाईट घडल्यास...; हगवणे प्रकरणावर PI शशिकांत चव्हाणांचं स्पष्टीकरण, पत्रात काय म्हटलं?

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. शिंदेंच्या गळाला सांगलीतील बडा नेता लागला आहे. सांगलीचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सरकारसोबत जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. चंद्रहार पाटील यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरून सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं.

Eknath Shinde  news
BJP : निवडणुकीआधी भाजपला मोठा झटका; बड्या नेत्याने सोडली साथ

चंद्रहार पाटील काय म्हणाले?

'राज्यातील क्रीडा क्षेत्रात काम करत असताना बऱ्याच अडचणी आणि त्रुटी गैरकारभार मी अनुभवले आहेत. या बाबींविरोधात मी वेळोवेळी आवाज उठवला आहे. परंतु प्रत्यक्ष शासन सहभागाशिवाय असे प्रश्न मार्गी लागणे कठीण आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात सुसूत्रता आणण्यासाठी आणि सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे चंद्रहार पाटील यांनी सांगितले.

Eknath Shinde  news
Ladki Bahin Yajana : लाडकी बहीण योजनेमुळे सरकार अडचणीत, कारण....; महाविकास आघाडीच्या नेत्याने हिशोबच मांडला

दरम्यान, सांगली लोकसभा निवडणुकीत चंद्रहार पाटील यांनी ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली होती. मात्र, काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांनी चंद्रहार पाटील यांचा पराभव केला. त्यानंतर महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप झाले. सांगलीतील काँग्रेसच्या भूमिकेवर चंद्रहार पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. निवडणुकीच्या काही महिन्यानंतर चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर चंद्रहार पाटील शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर आज चंद्रहार पाटील यांनी सरकारसोबत जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com